VIDEO : नवीन-उल-हक सुधर जरा, अफगाण खेळाडू पुन्हा चाहत्यांच्या निशाण्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक जेव्हापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर स्टार फलंदाज विराट कोहली याच्याशी भिडला तेव्हापासून तो चाहत्यांचे लक्ष्य बनला आहे. त्या घटनेनंतर मैदानावर असो वा सोशल मीडियावर, चाहते अफगाणिस्तानच्या या खेळाडूला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नवीन-उल-हक जिथे जिथे मैदानात जातो, तिथे त्याला फक्त कोहली-कोहलीचे नारे ऐकू येतात. असेच दृश्य शनिवारी रात्रीही पाहायला मिळाले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात नवीन जेव्हा गोलंदाजी करत होता, तेव्हा चाहते सतत कोहलीच्या नावाचा जयघोष करत होते. पण सामन्यादरम्यान त्याने असे कृत्य केले, ज्यामुळे तो पुन्हा चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.
खरंतर, 14व्या षटकात रवी बिश्नोईने रहमानउल्ला गुरबाजचा शानदार झेल घेतला तेव्हा नवीनने प्रेक्षकांच्या दिशेने बघत आपल्या तोंडावर बोट ठेऊन त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्धच्या सामन्यात एलएसजीचा मार्गदर्शक गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी असेच काहीसे केले होते. या कोहलीने 1 मे च्या लखनौ येथील सामन्यात गंभीरच्या कृतीला जसास तसे प्रत्युत्तर दिले होते. आता नवीन उल हकने कोलकात्याच्या प्रेक्षकांना उद्देशून टीप्पणी केल्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
विराट कोहली-नवीन-उल-हक यांच्यात शाब्दिक चकमक
आयपीएलच्या 43 व्या सामन्यात एलएसजी आणि आरसीबी यांच्यात सामना झाला. तेव्हा विराट कोहली अतिशय आक्रमक फॉर्ममध्ये होता. यादरम्यान कोहली आपल्या गोलंदाजाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगत होता. अशा स्थितीत नवीन-उल-हक मैदानावरच विराटशी भिडला. यादरम्यान त्याचा साथीदार अमित मिश्रा आणि पंच यांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेदरम्यान नवीन आणि कोहली नजरे-नजरेने खुन्नस पहायलाला मिळाली.
सामना संपत असताना गौतम गंभीरने हस्तक्षेप करताच या घटनेने वादाचे वळण घेतले. गंभीर आणि विराटमध्ये मोठा वाद झाला. बीसीसीआयने या तिन्ही खेळाडूंना खिलाडूवृत्ती न राखल्याने दंडही ठोठावला होता.
केकेआरने सामना अवघ्या 1 रनने गमावला
केकेआरविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर लखनौने प्रथम फलंदाजी करताना 176 धावा केल्या. ज्यामध्ये बचाव करताना त्याच्या गोलंदाजांची अवस्था बिकट झाली. या सामन्यात लखनौचा खेळाडू नवीन-उल-हकने 19 वे षटक टाकले जे खूप महागात ठरले. नवीनच्या या षटकामुळे लखनौ संघाला पराभव पत्करावा लागला असता. त्या षटकात केकेआरने 20 धावा वसूल केल्या. यानंतर शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या यश ठाकूरला 21 धावा बचाव करण्यात घाम फुटला. पण अखेर लखनौने सामना एक रनने जिंकला.
The slower ball 👌
The catch 🫣
The celebration 🤫It’s all happening in #KKRvLSG 👀#TATAIPL #IPLonJioCinema #EveryGameMatters pic.twitter.com/YGVwIKHWbZ
— JioCinema (@JioCinema) May 20, 2023