Hardik Pandya : मुंबईविरूध्दच्या सामन्यात हार्दिकने का केली नाही गोलंदाजी? जाणून घ्या कारण.. | पुढारी

Hardik Pandya : मुंबईविरूध्दच्या सामन्यात हार्दिकने का केली नाही गोलंदाजी? जाणून घ्या कारण..

पुढारी ऑनलाईन डेस्क : शुक्रवारी (दि.१२) झालेल्या मुंबई विरूध्दच्या सामन्यात गुजरातकडून हार्दिक पंड्याने गोलंदाजी न केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेहमी हार्दिक गुजरातसाठी नव्या चेंडूने गोलंदाजीची सुरूवात करतो. परंतु, कालच्या सामन्यात असे झाले नाही याचे कारण आता समोर येत आहे. (Hardik Pandya)

गुजरात टायटन्स आयपीएलच्या पॉईँट टेबलमध्ये १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. शुक्रवारी झालेल्या गुजरातला मुंबईविरूद्धच्या सामन्यात २७ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईने सामना जिंकला असला तरी गुजराजच्या स्थानाला कोणताच धक्का बसलेला नाही. मात्र, या सामन्यात गुजरातच्या चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी गोष्ट घडली आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मुंबईविरूद्ध एकही ओव्हर केली नाही. यामुळे गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसोबत मोहित शर्माने नवीन बॉल टाकल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. (Hardik Pandya)

काल झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबईविरूद्ध पाच गोलंदाजांचा वापर केला. यामध्ये मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी सामन्याच्या सुरूवातीला ओव्हर केली. मधल्या ओव्हरमध्ये राशिद खान आणि नूर अहदम यांनी गोलंदाजीची जबाबदारी पार पाडली. शेवटच्या ओव्हरमध्ये अल्झारी जोसेफने गोलंदाजीची धुरा सांभाळली.

सामन्यामध्ये हार्दिकच्या गोलंदाजी न करण्यामागचे कारण सांगितले आहे की, सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या पाठीची दुखापत झाली. त्यामुळे त्याने धोका न पत्करता गोलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या दृष्टीने हार्दिक पांड्याचा फिटनेस हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्यामुळे यावर लवकर निर्णय घेऊन हार्दिकला गोलंदाजी करण्यापासून त्याला दूर ठेवण्यात आले. सामन्यात जरी हार्दिकने गोलंदाजी केली नसली तरी त्याने मैदानावर जाऊन संघासाठी योगदान दिले.

हेही वाचा;

Back to top button