WTC Final 2023 : के. एल. राहुलच्या जागी इशान किशनला संधी | पुढारी

WTC Final 2023 : के. एल. राहुलच्या जागी इशान किशनला संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओवलच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. अंतिम सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने असणार आहेत. अंतिम सामन्यासाठी यापूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, आयपीएल २०२३ मध्ये के. एल. राहुलला दुखापत झाल्याने तो आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातूनही बाहेर पडला आहे. त्यामुळे के. एल. राहुलच्या जागी इशान किशनला संधी देण्यात आली आहे. (WTC Final 2023)

के. एल. राहुल आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत होता. दरम्यान, एका सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना मांडीला दुखापत झाली. यानंतर के. एल. राहुलला आयपीएल बरोबरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधूनही बाहेर पडावे लागले आहे. दुसरीकडे इशान किशनने मुंबई इंडियन्सकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इशानला संधी देण्यात आली आहे. (WTC Final 2023)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के. एस. भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट आणि इशान किशन (WTC Final 2023)

हेही वाचलंत का?

Back to top button