Sanju Samson : संजू सॅमसनने मोडला केएल राहुलचा ‘हा’ मोठा विक्रम! | पुढारी

Sanju Samson : संजू सॅमसनने मोडला केएल राहुलचा ‘हा’ मोठा विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) राजस्थान रॉयल्सला (RR) 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने हैदराबादला 215 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे राजस्थानचा पराभव झाला. अब्दुल समदने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत हैदराबादला विजय मिळवून दिला. मात्र सामना हरल्यानंतरही राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या (sanju samson) नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली.

संजू सॅमसनने केला चमत्कार (sanju samson)

राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनने शानदार फलंदाजी केली. त्याने 4 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर 38 चेंडूत 66 धावा फटकावल्या. त्याच्यामुळेच राजस्थानचा संघ मोठी धावसंख्या करू शकला. आपल्या डावातील पाचवा षटकार मारताच सॅमसनने आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून 114 षटकारांपर्यंत मजल मारली आणि केएल राहुलला मागे टाकले. राहुलच्या नावावर यष्टीरक्षक म्हणून 109 षटकार आहेत. त्याचबरोबर ऋषभ पंतने यष्टिरक्षक म्हणून 123 षटकार ठोकले आहेत, ज्या पद्धतीने संजू खेळत आहे. तो पंतचा विक्रमही मोडू शकतो.

आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू :

1. महेंद्रसिंग धोनी : 232 षटकार
2. दिनेश कार्तिक : 131 षटकार
3. ऋषभ पंत : 123 षटकार
4. संजू सॅमसन : 114 षटकार
5. केएल राहुल : 109 षटकार
6. क्विंटन डी कॉक : 108 षटकार

संजू सॅमसन (sanju samson) 2013 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 149 सामन्यांमध्ये 3 शतकांसह 3834 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 20 अर्धशतके आली आहेत. 119 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे.

रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 214 धावा करून पराभवाचा सामना करावा लागला. आरआरचा हा सलग तिसरा पराभव आहे. या संघाने आतापर्यंत 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर त्यांना 5 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचा नेट रन रेट 0.388 आहे.

Back to top button