Doha Diamond League : निरज चोप्राने रचला इतिहास; ८८.६७ मीटर लांब भाला फेकत ठरला सर्वश्रेष्ठ

Doha Diamond League : निरज चोप्राने रचला इतिहास; ८८.६७ मीटर लांब भाला फेकत ठरला सर्वश्रेष्ठ
Published on
Updated on

दोहा (कतार); पुढारी ऑनलाईन : नीरज चोप्राने (Neeraj Chopra) दोहा डायमंड लीग मीटमध्ये ८८.६७ मीटर भाला फेक करून पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली. भारतीय खेळाडूने पहिल्याच थ्रोमध्ये सर्वोत्तम आकडा गाठला. यासह नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. (Doha Diamond League)

नीरज चोप्राने ८८.६७ मीटर भाला फेक करून पहिले स्थान पटकावले तर झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेज्चने 88.63 मीटर भाला फेक करत दुसरे स्थान आणि ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 85.88 मीटर भाला फेकत तिसरे स्थान पटकावले. (Doha Diamond League)

नीरजची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी ८९.९४ मीटर आहे. जो त्याचा राष्ट्रीय विक्रमही आहे. २०१८ मध्ये दोहा डायमंड लीगमध्ये त्याने २०१८ मध्ये ८७.४३3 मीटरसह चौथे स्थान पटकावले होते. पूर्ण तंदुरुस्ती आणि पुरेशा ताकदीअभावी नीरजला गेल्या वर्षी येथे सहभागी होता आले नव्हते. गेल्या सप्टेंबरमध्ये झुरिचमध्ये २०२२ ग्रँड फिनाले जिंकल्यानंतर डायमंड लीग चॅम्पियन बनणारा तो पहिला भारतीय ठरला.

एक महिन्यापूर्वी, नीरज चोप्रा लुझने येथे डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता. नीरजने गेल्या महिन्यात सांगितले होते की, या क्षणी त्याला शारीरिक आणि तांत्रिकदृष्ट्या बरे वाटत आहे, परंतु गेल्या वर्षी येथील अत्यंत खडतर स्पर्धा लक्षात घेता सीझनचा प्रारंभ करताना डायमंड लीगमध्ये सर्वोच्च पारितोषिक जिंकणे त्याच्यासाठी सोपे नव्हते.

लुसानमध्ये सुद्धा पटकावले विजेतेपद

दोहा येथे झालेल्या पहिल्या डायमंड लीगमध्ये आणि सिलेसिया येथे झालेल्या तिसऱ्या डायमंड लीगमध्ये नीरजने भाग घेतला नव्हता. त्याने स्टॉकहोममध्ये 89.94 मीटरवर भालाफेक करून राष्ट्रीय विक्रम केला होता, मात्र एवढे अंतर असतानाही त्याने येथे रौप्यपदक जिंकले. तो लुसानेमध्ये विजेता ठरला आणि आता त्याने अंतिम फेरीतही सुवर्णपदक जिंकले आहे.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news