Virendra Sehwag : विदर्भाचा ‘पोट्टा’ जितेश शर्मावर सेहवाग फिदा | पुढारी

Virendra Sehwag : विदर्भाचा ‘पोट्टा’ जितेश शर्मावर सेहवाग फिदा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग पंजाब किंग्जचा युवा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माच्या कामगिरीने खूप प्रभावित झाला आहे. सेहवाग म्हणाला की, जितेशला टी-20 फलंदाजीची मूलभूत तत्त्वे सापडली आहेत आणि ते त्याचे पालन करत आहे. पुढील एक वर्षात जितेश भारतीय संघात खेळताना दिसणार असल्याचेही सेहवागने सांगितले. तो म्हणाला, ‘मी मुलांना नेहमी सांगतो की फक्त चेंडू पाहा आणि तुम्हाला चेंडू सोडायचा असेल, बचाव करायचा असेल किंवा सीमापार पाठवायचा असेल, हे तुम्ही ठरवा. हे फलंदाजीचे साधे मूलभूत तत्त्व आहे आणि जितेश तेच करत आहे.’ जितेश हा विदर्भाकडून रणजी सामने खेळतो. (Virendra Sehwag)

सेहवाग पुढे म्हणाला, ‘जितेश चेंडू पाहून खेळत होता. चेंडूला जोरदार फटके मारायचे होते, तर त्याने शॉटस् स्विंग केले तो अगदी सहजतेने फलंदाजी करत आहे. मात्र, धावा काढण्यासाठी जितेशला खूप मेहनत करावी लागेल. खेळपट्टी चांगली होती, पण मुंबई इंडियन्सची गोलंदाजी चांगली नव्हती. जर मी 13 वर्षांखालील मुलांसोबत खेळलो तर कदाचित मी धावा करू शकणार नाही. धावा काढण्यासाठी मला त्यांच्यासारखे खेळावे लागेल. जितेशने येथे तेच केले. (Virendra Sehwag)

हेही वाचा;

Back to top button