Suryakumar WTC Final : राहुलच्या दुखापतीचा सूर्याला होणार फायदा, मिळणार लंडनचे तिकीट! | पुढारी

Suryakumar WTC Final : राहुलच्या दुखापतीचा सूर्याला होणार फायदा, मिळणार लंडनचे तिकीट!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar WTC Final : खराब फॉर्ममुळे कसोटी संघातून वगळलेला सूर्यकुमार यादव आता 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलसाठी स्टँडबाय म्हणून लंडनला जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘अद्याप अधिकृतपणे निर्णय घेतलेला नसला तरी सूर्यकुमार यादवला अलीकडेच त्याचा यूकेचा व्हिसा तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.’

सूर्याने या वर्षी फेब्रुवारीमध्ये कसोटी प्रदार्पण केले. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या नागपूर येथील कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना तो आठ धावांवर बाद झाला होता.

केएल राहुल दुखापतीमुळे (Suryakumar WTC Final)

केएल राहुल दुखापतीमुळे आयपीएल आणि त्यानंतर डब्ल्यूटीसी फायनलमधून बाहेर पडला आहे. परिणामी धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमारचा कसोटी संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्याचे खूपच खराब प्रदर्शन झाले आहे. वनडे मालिकेतील तीनही सामन्यांत तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. मात्र, हे अपयश मागे टाकून सूर्याने आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्याने 184.13 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने तीन अर्धशतके झळकावली असून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

दरम्यान, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, नवदीप सैनी यांची डब्ल्यूटीसी फायनलसाठी आधीच स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

Back to top button