छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार आपले निवडणूक आश्वासन पूर्ण करण्यासाठी दारू बंदीची तयारी करत आहे. दरम्यान, भूपेश सरकारमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री अनिला भेडिया यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
तणावातून मुक्त होण्यासाठी त्यांनी स्त्रियांना झोपायच्या आधी पेग घेण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात वाद सुरू झाला आहे. त्या म्हणाल्या की, महिला घर आणि कुटुंबाची काळजी घेतात. त्यांना मानसिक तणाव जाणवतो. अशा परिस्थितीत, थोडे थोडे प्या आणि झोपा. अस वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री अनिला भेडिया यांनी केलं आहे.
या वक्तव्याने छत्तीसगडमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. छत्तीसगडमध्ये भूपेश सरकार सत्तेत आहे. या सरकारमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री अनिला भेडिया या आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी दारु बंदी करण्याचे आश्वासन दिले होते. पण आज त्यांच्याच मंत्रिमंडळातील महिला मंत्र्याने वक्तव्याने गोंधळ निर्माण झाला आहे.