महादेव जानकर : “माझा पक्ष उत्तर प्रदेशात चांगलं काम करत आहे, ताई तू तेथूनही खासदार होशील” | पुढारी

महादेव जानकर : "माझा पक्ष उत्तर प्रदेशात चांगलं काम करत आहे, ताई तू तेथूनही खासदार होशील"

सावरगाव (बीड) : पुढारी ऑनलाईन

“आम्ही गद्दार, लाचार होणार नाही. सत्तेपाठी आम्ही भीक मागत नाही. नेते पद रक्तात असावं लागतं, नेता विकत घेता येत नाही. मी पठ्ठ्या पंकजाताईंचा भाऊ आहे ना महादेव जानकर. मी मेलो तरी ताई तुला सोडणार नाही. मुंढे नसते तर जानकर मेंढरं राखत बसला असता. मी पुन्हा तिकीट मागायला जाणार नाही. ताई तू काळजी करून नको. माझा पक्ष उत्तर प्रदेशात चांगलं काम करत आहे, तिथूनही तू खासदार होशील.ओबीसींची अवस्थेला जबाबदार कोण?”, असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

दसऱ्यानिमित्त सावरगाव येथील भगवानगडावर आयोजित केलेल्या मेळाव्यात जानकर बोलत होते. या मेळाव्यात खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या. “आपला मेळावा हा कोणत्या पक्षाचा नाही. मनात शंका असलेल्यांनी हा जनसमुदान पाहावा. आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा. मुंडे परिवारासाठी हा मेळावा खूप महत्वाचा आहे. हे व्यासपीठ आघाडीचं नाही, प्रत्येक वंचितासाठीचं व्यासपीठ आहे. उशीर झाला तरीही गर्दी तेवढीच आहे. अशा मेळाव्यातून संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते”, असे मत खासदार प्रितम मुंडे यांनी व्यक्त केले.

Back to top button