GT vs DC : गुजरात टायटन्सने कॅपिटल्सला 130 धावांत रोखले; शमीच्या हल्ल्यात दिल्ली घायाळ

GT vs DC : गुजरात टायटन्सने कॅपिटल्सला 130 धावांत रोखले; शमीच्या हल्ल्यात दिल्ली घायाळ
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हल्ल्यात दिल्लीकर घायाळ झाले. शमीच्या धारदार गोलंदाजीमुळे दिल्लीची अवस्था एकवेळ 5 बाद 23 अशी हालाखीची झाली होती, परंतु अक्षर पटेल आणि अमन हकीम यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे दिल्लीला 8 बाद 130 धावांपर्यंत मजल मारता आली. अक्षरने 27 तर अमनने 51 धावा केल्या. शमीने 11 धावांत 4 विकेटस् घेतल्या. (GT vs DC)

पॉईंट टेबलमध्ये अव्वल असणार्‍या गुजरात टायटन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गुणतालिकेतील तळात असलेल्या दिल्लीचा उरला सुरला आत्मविश्वास मोहम्मद शमीने घालवून टाकला. गुजरातने दिल्लीला पहिल्या 5 षटकांत 5 धक्के दिले. यातील 4 विकेटस् एकट्या मोहम्मद शमीने घेतल्या. शमीने सॉल्टला पहिल्या चेंडूवर शुन्यावर बाद केले.

त्यानंतर रिले रूसोला 8 तर मनीष पांडेला 1 धावेवर बाद केले. पाठोपाठ पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रियम गर्गला 10 धावांवर बाद करत आपली चौथी शिकार केली. शमीने दिल्लीची अवस्था 5 षटकात 5 बाद 23 धावा अशी केली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर 2 धावा करून धावबाद झाला.

मोहम्मद शमीने दिल्लीची अवस्था 5 बाद 23 धावा अशी केल्यानंतर अक्षर पटेल आणि अमन हकीम खान यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत दिल्लीची लाज वाचवण्याचा प्रयत्न केला. ही जमलेली जोडी शतकी मजल मारून देणार असे वाटत असतानाच मोहित शर्माने 30 चेंडूत 27 धावा करणार्‍या अक्षर पटेलला बाद केले.

अक्षर बाद झाल्यानंतर अमनने डावाची सूत्रे आपल्या खांद्यावर घेत दिल्लीला शतकी मजल मारून दिली. त्याला रिपल पटेलने आक्रमक साथ दिली. दरम्यान, अमनने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र, अर्धशतकानंतर (51) राशिद खानने त्याचा अडसर दूर करत दिल्लीला 126 धावांवर 7 वा धक्का दिला. यानंतर डावाच्या शेवटच्या षटकात मोहित शर्माने रिपल पटेलला 23 धावांवर बाद करत आपली 100 वी आयपीएल विकेट देखील साजरी केली.

 (GT vs DC)

अपडेट्स : 

पहिल्याच बॉलवर दिल्लीला धक्का; सॉल्ट बाद

सामन्याच्या पहिल्याच बॉलवर दिल्लीला पहिला धक्का बसला. मोहम्मद शमीने फिलिप सॉल्टला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सॉल्टला खातेही उघडता आले नाही. त्याचा झेल डेव्हिड मिलरने घेतला.

दिल्लीला पाठोपाठ धक्का; वॉर्नर बाद

सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये दिल्लीला कर्णधार वॉर्नरतच्या रूपात दुसरा धक्का बसला. एकेरी धाव घेताना डेव्हिड वॉर्नर नो बॉलवर दुर्दव्याने बाद झाला. त्याने आपल्या खेळीत २ बॉलमध्ये २ धावाकरून तंबूत परतला. त्याला गुजरातच्या राशिद खानने धावबाद केले.

दिल्लीला तिसरा धक्का; रिले रूसो बाद

सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये दिल्लीची तिसरी विकेट पडली. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मह शामीने रिले रूसोला विकेटकीपर साहाकरवी झेलबाद केले. रूसोने आपल्या खेळीत ६ बॉलमध्ये ८ धावा केल्या.

दिल्लीचा निम्मा संघ तंबूत

सामन्याच्या पाचव्या ओव्हरमध्ये मनिष पांडेच्या रूपात दिल्लीला चौथा धक्का विकेट पडली. मनिषने ४ बॉलमध्ये १ धावकरून तंबूत परतला. त्याला मोहम्मद शामीने विकेटकीपर साहाकरवी झेलबाद केले. याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने आपल्या तिखट माऱ्याने दिल्लीचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर प्रियम गर्गला बाद केले. शामीने त्याला विकेटकीपर साहाकरवी झेलबाद केले. गर्गने आपल्या खेळीत १४ बॉलमध्ये १० धावा केल्या. सामन्यात गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने ३ ओव्हरमध्ये ७ धावा देत ४ विकेट घेतल्या आहेत.

अमन-अक्षरने डाव सांभाळला

१२ ओव्हरनंतर दिल्लीने पाच गडी गमावून ६१ धावा केल्या आहेत. सध्या अमन खान २६ चेंडूत १९ धावा आणि अक्षर पटेल २६ चेंडूत २४ धावा करत फलंदाजी करत आहे.

दिल्लीला सहावा धक्का; मोहित शर्मा बाद

सामन्याच्या १४ व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलच्या रूपात दिल्लीला सहावा धक्का बसला. गुजरातचा गोलंदाज मोहित शर्माने अक्षर पटेलला बाद केले. अक्षरने आपल्या खेळीत ३० बॉलमध्ये २७ धावांची खेळी केली. मोहितने त्याला राशिद खानकरवी झेलबाद केले.

अमनचे संयमी अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्सच्या एका पाठोपाठ विकेट पडत असताना अमनने संयमी खेळी करत आपले ४२ बॉलमध्ये आपले अर्धशतक केले. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार लगावले.

अर्धशतककरून अमन माघारी; दिल्लीला सातवा धक्का

सामन्याच्या १९ व्या ओव्हरमध्ये गुजरातचा फिरकीपटू राशिद खानने दिल्लीला अमनच्या रूपात सातवा धक्का दिला. राशिद खानने त्याला अभिनव मनोहरकरवी झेलबाद केले. अमनने आपल्या खेळीत ४४ बॉलमध्ये ५१ धावा केल्या. यामध्ये त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार लगावले.

दिल्लीला आठवा धक्का

सामन्याच्या २० ओव्हरमध्ये दिल्लीला आठवा धक्का बसला. रिपल पटेलला गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने बाद केले. रिपलने आपल्या खेळीत १३ बॉलमध्ये २३ धावांची खेळी केली.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news