परभणी : कौसडी ग्रा.पं. पोटनिवडणुकीसाठी ८ उमेदवारांचे अर्ज दाखल

परभणी : कौसडी ग्रा.पं. पोटनिवडणुकीसाठी ८ उमेदवारांचे अर्ज दाखल
Published on
Updated on

कौसडी; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक – ६ मध्ये रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागेसाठी आज (दि.२) अखेरच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक ६ मधून भाजपचे जाहेदाबी गफ्फार शेख निवडून आले होते. दरम्यान, ९ ऑक्टोंबररोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या वार्ड क्रमांक-६ मध्ये पोटनिवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. या जागेसाठी १८ मेरोजी मतदान होणार आहे. तर १९ मेरोजी निकाल जाहीर होणार आहे.

भाजपकडून – २ राष्ट्रवादीकडून -१ काँग्रेसकडून-४ उद्धव ठाकरे गटाकडून -१ असे एकूण ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज छाननी ३ मेरोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ८ मेरोजी होणार आहे. दरम्यान, अर्ज माघारीनंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तर इच्छुकांची संख्या पाहता ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news