Arjun Tendulkar : ‘या’ खेळाडूमुळे अर्जुन तेंडुलकरचे मुंबई इंडियन्समधील स्थान धोक्यात | पुढारी

Arjun Tendulkar : ‘या’ खेळाडूमुळे अर्जुन तेंडुलकरचे मुंबई इंडियन्समधील स्थान धोक्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सचा (mumbai indians) वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरसाठी (Arjun Tendulkar) आयपीएलमधील (IPL 2023) पुढील वाटचाल अवघड झाली आहे का? त्याने आयपीएलमध्ये एमआयसाठी सलग चार सामने खेळले, परंतु त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.

अर्जुनच्या जागी प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेल्या खेळाडूने इतकी चांगली कामगिरी केली आहे की आता या माजी दिग्गज खेळाडूच्या मुलाचे ययंदाच्या हंगामात पुनरागमन होणे अवघड वाटत आहे. पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन काय विचार करते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अर्जुन तेंडुलकरच्या जागी अर्शद खान (Arjun Tendulkar)

अर्जुन तेंडुलकरने आयपीएल करियरचा पहिला सामना केकेआरविरुद्ध खेळला. त्या सामन्यात त्याने ओपनिंग गोलंदाजाची भूमिका निभावली. त्याने सामन्यात एकून 2 षटके टाकली आणि 17 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या दुस-या सामन्यात अर्जुन आयपीएलमधील पहिली विकेट घेण्यात यशस्वी ठरला. त्याने भुवनेश्वर कुमारला बाद केले.

पंजाब किंग्जविरुद्ध तिस-या लढतीत त्याने एक विकेट घेतली. पण 48 धावा खर्च केल्या. पंजाबच्या फलंदाजांनी त्याच्या एका षटकात 31 धावा चोपल्या. यानंतरही रोहित शर्माने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले आणि गुजरात टायटन्सविरुद्धच्या पुढच्या सामन्यात अर्जुनने नऊ धावांत एक विकेट घेतली. अर्जुनसाठी या चार सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला एकदाही त्याच्या कोट्यातील पूर्ण चार षटके टाकता आली नाहीत.

यानंतर पुढच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि अर्शद खानचा (arshad khan) संघात समावेश करण्यात आला. अर्शदने देखील यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे, तो पहिल्या सामन्यात काही विशेष करू शकला नाही, त्यानंतर अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी देण्यात आली. परंतु वानखेडे मैदानावर खेळल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने चमत्कार केला.

अर्शदने मिळवले तीन बळी (arshad khan)

अर्शद खानने यावर्षी आरसीबीविरुद्ध पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने 28 धावांत एक विकेट घेतली. यानंतर त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 35 धावा दिल्या आणि विकेट मिळवण्यात तो अपयशी ठरला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही त्याची झोळी रिकामीच राहिली. यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली. अखेर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अर्शदने जबरदस्त पुनरागमन केले आणि तीन षटकांत 39 धावा देऊन तीन बळी टीपले. त्याने संजू सॅमसनला स्वस्तात बाद केले, त्यानंतर शिमरोन हेटमायरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर शतकवीर यशस्वी जयस्वालला रोखले.

आता मुंबई इंडियन्सचा संघ (mumbai indians) अशा टप्प्यावर आहे, जिथे एका सामन्यातील पराभवही त्यांचा प्लेऑफचा मार्ग रोखू शकतो. अशा परिस्थितीत रोहित शर्मा पुढील सामन्यात अर्शद खान (arshad khan) की अर्जुन तेंडुलकर या दोघांपैकी कुणाला संधी देतो हे पाहावे लागेल.

Back to top button