Yashasvi Jaiswal : झुंझार शतकी खेळी करून जयस्वालने रचले 5 मोठे विक्रम | पुढारी

Yashasvi Jaiswal : झुंझार शतकी खेळी करून जयस्वालने रचले 5 मोठे विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) रविवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरश: धुऽऽ धुऽऽ धुलाई केली. आरआरच्या या डावखु-या फलंदाजाने वानखेडे मैदानावर चौफेर फटकेबाजी केली आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 62 चेंडूत 16 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 124 धावा फटकावणारा जयस्वाल आता आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहचला आहे. तो ऑरेंज कॅप आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे. यासह त्याने पाच मोठे विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.

जयस्वालने (Yashasvi Jaiswal) आयपीएलचा 1000 वा सामना आपल्या शतकी खेळीने अधिक खास बनवला. त्याची तडफदार खेळी पाहून सारेच भारावले आहेत. आता थेट बीसीसीआयची निवड समिती या डावखु-रा फलंदाजाची दखल घेईल अशी चर्चा रंगली आहे. जयस्वालने शतकी खेळीच्या जोरावर आरआर संघाने मुंबईविरुद्ध 212 धावांपर्यंत मजल मारली. ही राजस्थानची मुंबईविरुद्धची सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

राजस्थानसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (Yashasvi Jaiswal)

124 – यशस्वी जयस्वाल विरुद्ध मुंबई, वानखेडे, 2023
124 – जोस बटलर विरुद्ध हैदराबाद, दिल्ली, 2021
119 – संजू सॅमसन विरुद्ध पंजाब किंग्ज, मुंबई डब्ल्यूएस, 2021
116 – जोस बटलर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, 2022

IPL मध्ये अनकॅप्ड खेळाडूंची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

124 – यशस्वी जयस्वाल (राजस्थान) विरुद्ध MI, मुंबई, 2023
120* – पॉल वलथाटी (पंजाब) विरुद्ध CSK, मोहाली, 2011
115 – शॉन मार्श (पंजाब) विरुद्ध RR, मोहाली, 2008
114* – मनीष पांडे (बेंगलोर) विरुद्ध डेक्कन चार्जर्स, 2009

आयपीएल शतक झळकावणारे सर्वात तरुण खेळाडू

19 वर्षे, 253 दिवस – मनीष पांडे (बेंगलोर) विरुद्ध डेक्कन चार्जर्स, 2009
20 वर्षे, 218 दिवस – ऋषभ पंत (दिल्ली) विरुद्ध SRH, 2018
20 वर्षे, 289 दिवस – देवदत्त पडिक्कल (बेंगलोर) विरुद्ध RR, 2021
21 वर्षे, 123 दिवस – यशस्वी जैस्वाल (RR) विरुद्ध MI, 2023
22 वर्षे, 151 दिवस – संजू सॅमसन (DC) विरुद्ध रायझींग पुणे सुपर जाएंट, 2017

आयपीएल 2023 ऑरेंज कॅप

यशस्वी जयस्वाल : सामने 9, धावा 428
फाफ डू प्लेसिस : सामने 8, धावा 422
डेव्हॉन कॉनवे : सामना 9, धावा 414
ऋतुराज गायकवाड : सामने 9, धावा 354
विराट कोहली : सामने 8, धावा 333

यशस्वी जयस्वालचे शेवटचे 4 डाव

124 (62) विरुद्ध मुंबई इंडियन्स
77 (43) विरुद्ध चेन्नई, जयपूर
47 (37) विरुद्ध आरसीबी, बंगळूर
44 (35) विरुद्ध लखनौ, जयपूर

राजस्थानची मुंबईविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या

212/7 – मुंबई वानखेडे, 2023
193/8 – मुंबई (DYP), 2022
189/4 – मुंबई वानखेडे, 2014
179/3 – जयपूर, 2013

 

Back to top button