IPL चे मैदान बनले कुस्तीचा आखाडा, दिल्ली-हैदराबाद मॅचवेळी फ्री स्टाईल हाणामारी(Video)

IPL चे मैदान बनले कुस्तीचा आखाडा, दिल्ली-हैदराबाद मॅचवेळी फ्री स्टाईल हाणामारी(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आतापर्यंत जवळपास सर्वच सामन्यांसाठी स्टेडियम खचाखच भरलेले दिसले. हे सामने आणि त्यांचे आवडते खेळाडू पाहण्यासाठी लोक विक्रमी संख्येने स्टेडियममध्ये पोहोचत आहेत. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये चाहत्यांमध्ये लाथा-बुक्क्यांनी हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडल्याचे समजते आहे. (sunrisers hyderabad vs delhi capitals)

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 40 वा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने यजमान दिल्ली कॅपिटल्सचा 9 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अरुण जेटली स्टेडियमचा असल्याचा दावा केला जात आहे.

सामन्यादरम्यान स्टेडियममधील एक स्टँड कुस्तीचा आखाडा बनल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, कोणत्यातरी मुद्द्यावरून प्रेक्षकांमध्ये बाचाबाची होते. काही चाहत्यांच्या हातात दिल्ली कॅपिटल्सचा झेंडा दिसत आहे. मारामारीदरम्यान पाच ते सहा जण एकमेकांना भिडतात. मात्र, या वादाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. हा व्हायरल व्हिडिओ 45 सेकंदाचा आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड राहिले. अभिषेक शर्माच्या अष्टपैलू खेळामुळे आणि हेनरिक क्लासेनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा हा सहावा पराभव ठरला.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने सलामीवीर अभिषेकच्या 36 चेंडूत 67 धावा आणि क्लासेनच्या 27 चेंडूत केलेल्या नाबाद 53 धावांच्या जोरावर 6 बाद 197 धावा केल्या. चालू हंगामातील या मैदानावरील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. संघाकडून अब्दुल समदने 21 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.

प्रत्युत्तरात दिल्लीला 20 षटकांत सहा गडी गमावून 188 धावाच करता आल्या. मिचेल मार्शचा अष्टपैलू खेळ आणि फिल सॉल्टसह दुसऱ्या विकेटसाठी 66 चेंडूत 112 धावांची खेळी संघासाठी अपुरी ठरली. मार्शने चार षटकांत 27 धावांत चार बळी घेतल्यानंतर 39 चेंडूंत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 63 धावा केल्या. सॉल्टने नऊ चौकारांच्या सहाल्याने 35 चेंडूत 59 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात अक्षर पटेलने 14 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 29 धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी आहे. संघाला 5 सामन्यात सलग पराभव स्वीकारावा लागला आहे. यादरम्यान त्यांनी त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सलग दोन सामने जिंकून दमदार पुनरागमन केले. मात्र आठव्या सामन्यात हैदराबादविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला. जर आपण आयपीएल 2023 च्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ 4 गुणांसह 10 व्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर आहे. लीगच्या 16व्या हंगामात डेव्हिड वॉर्नरच्या संघाने 8 सामने खेळले आहेत ज्यातील 2 जिंकले आहेत आणि 6 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. हैदराबादचा हा आठ सामन्यांमधला तिसरा विजय आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news