IPL 2023 Playoffs : प्लेऑफमधील सामन्यांचे शेड्यूल जाहीर, ‘या’ स्टेडियमवर खेळवला जाणार अंतिम सामना | पुढारी

IPL 2023 Playoffs : प्लेऑफमधील सामन्यांचे शेड्यूल जाहीर, 'या' स्टेडियमवर खेळवला जाणार अंतिम सामना

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रिमियर लीग २०२३ च्या ग्रुप स्टेजमधील सामने सध्या खेळवले जात आहेत. हे सामने अतिशय रोमांचक होताना दिसत आहेत. २० एप्रिल (गुरुवार) पर्यंत एकूण २८ सामने खेळवले गेले आहेत. दरम्यान, आयपीएल २०२३ च्या या हंगामाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२३ च्या प्लेऑफमधील सामन्यांचे शेड्युल जाहीर केले आहे. यासोबतच सामना कुठे खेळवला जाणार हेही जाहीर केले आहे. (IPL 2023 Playoffs)

आयपीएल २०२३ चा क्लालिफायर १ आणि एलिमिनेटर सामना चेन्नईच्या एम. चिंदबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वलिफायर २ आणि अंतिम सामनाही याच स्टेडियमवर खेळवला जाईल. ग्रप स्टेजमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेल्या संघ आणि एलिमिनेटरमधील विजय मिळवलेला संघ क्वालिफायर २ साठी खेळेल. (IPL 2023 Playoffs)

आयपीएल २०२३ च्या प्लेऑफ सामन्याचे शेड्यूल (IPL 2023 Playoffs)

२३ मे क्वालिफायर-1, चेन्नई

२४ मे एलिमिनेटर, चेन्नई

२६ मे क्वालिफायर-2, अहमदाबाद

२८ मे फाइनल, अहमदाबाद

 

हेही वाचलंत का?

Back to top button