मेंटोर धोनी मानधन किती घेणार? जय शहा यांनी केले स्पष्ट | पुढारी

मेंटोर धोनी मानधन किती घेणार? जय शहा यांनी केले स्पष्ट

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आगामी टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा मेंटोर असणार आहे. बीसीसीआयनेच त्यांची नियुक्ती केली आहे. मेंटोर धोनी विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला आपल्या अनुभवाच्या टिप्स देणार आहे. मात्र ज्यावेळी मेंटोर धोनी टीम इंडियासोबत जोडला जाणार अशी घोषणा झाली त्यावेळी काही जणांनी त्याविरुद्ध तक्रार केली.

मेंटोर धोनी हा लोधा समितीच्या शिफारसींचे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यांनी धोनाला आयपीएल खेळत असताना त्याची टीम इंडियाचा मेंटोर म्हणून निवड करणे हा कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच लाभाच्या पदाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणारे ठरते असे मत व्यक्त केले होते.

हेही वाचा : डॅनियल ख्रिस्तियन म्हणाला, माझ्या पत्नीला यापासून दूर ठेवा!

तेव्हापासूनच मेंटोर धोनी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मेंटोर म्हणून धोनीला बीसीसीआय किती मानधन देणार? असा प्रश्न आणि उत्सुकताही चाहत्यांच्या मनात होती. याबाबत आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी खुलासा केला आहे.

त्यांनी ‘महेंद्रसिंह धोनी टी २० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा मेंटोर असणार आहे. ही सेवा देण्यासाठी तो कोणत्याही प्रकारचे मानधन आकारणार नाही.’ असे स्पष्ट शब्दात सांगितले. म्हणजे मेंटोर धोनी आपल्या अनुभवाची पोटरी टीम इंडियासाठी विनाशुल्क उघडणार आहे.

हेही वाचा : विराट कोहलीचे नेतृत्व : मायकल वॉगनकडून कडवट विश्लेषण

टीम इंडिया आपले टी २० वर्ल्डकप अभियान २४ ऑक्टोबरला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सुरु करणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून तो टी २० वर्ल्डकपनंतर आपले कर्णधारपद सोडणार आहे. त्यामुळे धोनीच्या मार्गदर्शनाखाली तो यंदाचा वर्ल्डकप जिंकून एक तरी आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार.

हेही वाचा : IPL 2021 Eliminator : ‘आरसीबी’ पराभूत झाल्‍यानंतर विराट म्‍हणाला…

हेही वाचा : मुलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार; तज्ज्ञांकडून कोव्हॅक्सिनची शिफारस

 

विराट कोहलीनंतर कोण होईल आरसीबीचा कर्णधार? 

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button