भारत विरुद्धच्या ICC WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर | पुढारी

भारत विरुद्धच्या ICC WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ अंतिम सामन्यासाठी आणि पहिल्या दोन ॲशेस कसोटींसाठी संघ जाहीर केला आहे. निवड समितीने आज (दि.१९) १७ सदस्यीय संघात मॅट रेनशॉ, मार्कस हॅरिस आणि मिचेल मार्श यांचा समावेश केला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाला २८ मे पर्यंत संघांची संख्या १७ वरून १५ करावी लागणार आहे. त्यानंतर ॲशेस मालिका असल्याने शेवटच्या तीन कसोटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला लान्स मॉरिसला पाठीच्या दुखापतीमुळे सहा आठवडे विश्रांतीची आवश्यकता आहे. तो तंदुरुस्तीची चाचणी करण्यासाठी पुढील महिन्यात नॉर्थ हॅम्प्टनशायर सोबत गोलंदाजी करणार आहे. भारत दौऱ्यावर आलेले ॲश्टन अगर, पीटर हँड्सकॉम्ब, मिचेल स्वेपसन आणि मॅट कुहनेमन यांचा समावेश करण्यात आलेला नाही. ॲलेक्स कॅरीच्या जागी यष्टिरक्षक जोश इंग्लिसचा समावेश करण्यात आला आहे.

WTC Final आणि पहिल्या दोन ॲशेस कसोटींसाठी ऑस्ट्रेलियन संघ :

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.

हेही वाचा : 

Back to top button