MI vs SRH : मुंबईचा हैदराबादवर १४ धावांनी विजय | पुढारी

MI vs SRH : मुंबईचा हैदराबादवर १४ धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादचा त्यांच्या मैदानावर 14 धावांनी पराभव करत आपल्या विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. मुंबईने प्रथम फलंदाजी करत 193 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करताना हैदराबादचा संघ 178 धावांवर गारद झाला. मुंबईकडून बेहरेनडॉर्फ, मेरेडिथ, पियुष चावला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आपला दुसरा सामना खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने आज आपला 4 षटकाचा कोटा पूर्ण करत 18 धावा देत 1 बळी टिपला. मुंबईने या विजयाबरोबरच गुणतालिकेत 6 गुण घेत सहाव्या स्थानावर झेप घेतली.अर्जुनने 2.5 षटकात 18 धावा देत 1 विकेट घेतली. (MI vs SRH)

सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत पाच गडी गमावून 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 19.5 षटकांत 178 धावांत सर्वबाद झाला सनरायझर्ससाठी केवळ पाच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. मयंक अग्रवालने 41 चेंडूत सर्वाधिक 48 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 16 चेंडूत 36 धावा केल्या. एडन मार्करामने 22, मार्को जॅनसेनने 13 आणि वॉशिंग्टन सुंदरने 10 धावा केल्या. हॅरी ब्रूक नऊ, राहुल त्रिपाठी सात आणि अभिषेक शर्मा एक धावा काढून बाद झाले. संघाला अखेरच्या षटकांमध्ये अब्दुल समदकडून स्फोटक फलंदाजी अपेक्षित होती, मात्र तो 12 चेंडूत केवळ नऊ धावा करू शकला. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अर्जुन तेंडुलकर आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी एक यश मिळाले. (MI vs SRH)

हेही वाचा;

Back to top button