Heat Wave : विदर्भात उष्णतेची लहर; चंद्रपूरचे तापमान ४३.६ अंशावर | पुढारी

Heat Wave : विदर्भात उष्णतेची लहर; चंद्रपूरचे तापमान ४३.६ अंशावर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पूर्वविदर्भात उष्णतेची चांगलीच लहर आल्याने विदर्भ तापला आहे. बुलढाणा वगळता सर्वच जिल्ह्यातील तापमानाने उसळी घेतली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूरसह, गोंदिया वर्धा व गडचिरोलीच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. या मध्ये अनुक्रमे 43.3, 43.2 43.0 तर 40.6 अंशाने नोंद घेण्यात आली आहे. तसेच अमरावती 43.1 तर ब्रम्हपूरी 43.2 तापमानाची नोंद मंगळवारी (दि. १८) घेण्यात आली. आठवडाभरापासून चंद्रपूर व ब्रम्हपूरीचे तापमान 43 अशांचे वर असल्याने तापमानात दरदिवशी वाढ होत आहे. उष्ण लहरीचा नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे.

देशात उष्ण शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर, ब्रम्हपूरी मध्ये तापमानात सतत वाढ होत आहे. आठवडाभरापासून दोन्ही ठिकाणी तापमान 43 अशांचे वर आहे. आज मंगळवारी तापमानाची नोंद घेण्यात आली त्यामध्ये चंद्रपूर राज्यात सर्वात हॉट ठरले आहे. चंद्रपूर 43.6 तर ब्रम्हपुरी 43.2 अंश सेल्सिअस नोंद घेण्यात आली आहे. तसेच अमरावतीने चंद्रपूर शहराप्रमाणे तापमानात उसळी घेतली असून 43.1 तापमनाची नोंद करण्यात आली. वाढलेल्या तापमानामुळे आज मंगळवारी सकाळपासून उन्हाचे चटके नागरिकांना बसत आहेत. उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे.

चंद्रपूर प्रमाणे विदर्भातील गोंदिया, वर्धेच्या तापमानात वाढ झाली आहे. जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या गडचिरोली मध्ये पारा चढला आहे. गोंदिया 43.2, वर्धा 43.0, यवतमाळ 43.0, अकोला 42.8, नागपूर 41.2, वाशिम 42.0 अशी नोंद घेण्यात आली आहे. नेहमी चाळीशीच्या खाली असणारा गडचिरोली ‍जिल्हा आज मंगळवारी 40.6 वर पोहचला आहे. विदर्भातील बुलढाण्याचे 39.2 अंश तापमान वगळता सगळे जिल्हे चाळीशी ओलांडीत पूढे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे येत्या दिवसात पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्कॉय वॉच या खगोलीय संस्थेने नोंदविलेल्या तापमानात आज दुपारी तिन वाजता 44 अंश तापमानाचीनोंद घेण्यात आल्याचे स्कॉय वॉच संस्थेचे प्रा. सुरेश चोपणे यांनी माहिती दिली.

देशात सर्वात उष्ण शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदपूर शहरात व जिल्ह्यात सतत तापमान वाढ होत असल्याने कडक उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होत आहे. यावेळी वर्धा, गोंदिया, अमरावती ‍जिल्ह्यातील तापमान चंद्रपूरच्या मागे धावत उसळी घेत आहे.वि शेष म्हणजे गडचिरोली हा जंगलाचाजिल्हाह असूनही तापमान 40 अंशा पार गेले आहे. विदर्भात एप्रिल महिण्यातच सुर्य कोपला असून मे व जून अजून यायचा आहे. येत्या काळात तापमानाची तिव्रता वाढणार असल्याचे सांगीतले जात आहे.

Back to top button