Anand Mahindra : XUV 700 चा अजब-गजब रिव्ह्यू पाहून आनंद महिंद्रा झाले अवाक! | पुढारी

Anand Mahindra : XUV 700 चा अजब-गजब रिव्ह्यू पाहून आनंद महिंद्रा झाले अवाक!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : महिंद्रा अँड महिंद्राचे (Mahindra & Mahindra) चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. आनंद महिंद्रा अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पेजवर अनोख्या स्टोरी आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यांच्या मंडे मोटीव्हेशनचा चाहते आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या पोस्टमध्ये काही ना काही विशेष असतेच. या शिवाय ते लोकांच्या प्रतिक्रियांना उत्तर देण्याससुद्धा विलंब लावत नाहीत.

आता पुन्हा एकदा नव्याने आनंद महिंद्रांनी अशी एक पोस्ट रिट्विट केली आहे, जी पाहून तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावल व पोट धरुन हसाल. या व्हिडिओमध्ये एका मुलीने महिंद्राच्या एक्ययूव्ही ७०० (XUV 700) रिव्ह्यू अशा प्रकारे घेतला की जे पाहून स्वत: महिद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा सुद्धा आश्चर्य चकीत आणि अवाक झाले. (Anand Mahindra)

आरजे पुरखाने हा व्हिडिओ मजेशीर पद्धतीने बनवला आहे. आनंद महिंद्रा यांना टॅग करत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आरजेने २२ मार्च रोजी पोस्ट केला होता, ज्याला आनंद महिंद्रा यांनी आता उत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर आरजे पुरखा (@RJ_Purkhaa) नावाच्या युजर्सने महिंद्रा XUV 700 अशी काही छुपी वैशिष्ट्ये सांगितली की जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. तसेच आरजे पुरखाने कारच्या वेगवेगळ्या बटनांचा सांगितलेला वापर जर तुम्ही पाहिला तर लोट पोट होऊन हसाल. जसे की, कारमध्ये एक रिज्यूम बटन ज्याचा वापर तुम्ही तुमचा रिज्यूम नोकरी मिळवण्यासाठी पाठवू शकता. तर सींक बटनचा वापर सींक कबाबचे ऑर्डर करण्यासाठी होईल. तर SOS बटनाचा वापर करुन सॉसचे पॅकेट मिळेल असा दावा तिने केला. आनंद महिंद्रा यांना टॅग करत आरजेने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आरजेने २२ मार्च रोजी पोस्ट केला होता. ज्याला आनंद महिंद्रा यांनी रिप्लाय सुद्धा दिला आहे.

आनंद महिंद्रांचे उत्तर

आनंद महिंद्रा यांनी या ट्विटला रिट्विट करत उत्तर दिले की, हा व्हिडिओ मला अनेकदा मिळाला आहे. मी या ऑटोमोबाईल तज्ज्ञाला माझ्या डिझाईन स्टुडिओमध्ये आमंत्रित करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून ते आमच्या भविष्यातील वाहनांसाठी इंटीरियर डिझाइन कल्पना देऊ शकतील. आरजेने त्याच्या ट्विटला उत्तर देताना आनंद महिंद्राचे आभार मानले आणि सांगितले की मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यास तयार आहे.

अधिक वाचा :

Back to top button