

पारनेर, पुढारी वृत्तसेवा: जेव्हा राज्यावर किंवा देशावर संकटे आली, तेव्हा बाळासाहेबांनी सडेतोड परखड भूमिका घेतली. ठाकरे आणि ठाकरे गट सावरकरांचा अपमान होत असताना मूग गिळून गप्प बसत आहेत. जे सावरकरांचा अपमान करतात त्यांच्याबरोबर ते फिरतात. तसेच ज्या लोकांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याबरोबर गळा भेट करत असल्याची परखड टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले आहे. यामध्ये कोणतेही राजकारण आणून शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका, असं देखील शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे असून बळीराजाला आम्ही प्राधान्य दिलेले आहे. अयोध्येला गेल्यानंतर प्रभु रामचंद्रांकडे शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे. त्यांना अस्मानी संकटातून वाचव अशी प्रार्थना केली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.