KKR vs RCB : कोलकाताचा बंगळूरवर ८१ धावांनी विजय | पुढारी

KKR vs RCB : कोलकाताचा बंगळूरवर ८१ धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ८१ धावांनी पराभव केला. यासह कोलकाता संघाने स्पर्धेतील पहिला विजय संपादन केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने शार्दुल ठाकूरच्या ६८, रहमानउल्लाह गुरबाजच्या ५७ आणि रिंकू सिंगच्या ४६ धावांच्या जोरावर सात गडी गमावून २०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ १७.४ षटकांत १२३ धावांवर गारद झाला. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या.  (KKR vs RCB)

कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने चार, सुयश शर्माने तीन आणि सुनील नरेनने दोन गडी बाद केले. शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली. त्याचवेळी बेंगळुरूकडून डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद सिराज, मायकेल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने सात गडी गमावून २०४ धावा केल्या. कोलकाताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ६८ धावा केल्या. तिथे रिंकू सिंगने 46 धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे कोलकाता संघाला २०० हून अधिक धावा करता आल्या. रहमानउल्ला गुरबाजनेही ५७ धावांची खेळी खेळली. या तिघांशिवाय कोलकात्याच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बेंगळुरूकडून डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (KKR vs RCB)

हेही वाचा;

Back to top button