Yuzvendra Chahal : 4 षटकात 50 धावा देऊनही युझवेंद्र चहलने रचला इतिहास! | पुढारी

Yuzvendra Chahal : 4 षटकात 50 धावा देऊनही युझवेंद्र चहलने रचला इतिहास!

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. बुधवारी आयपीएलच्या 8 व्या सामन्यात त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध खेळताना ही कामगिरी नोंदवली.

चहलने मलिंगाला टाकले मागे

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चहल (Yuzvendra Chahal) हा ड्वेन ब्राव्होनंतर दुसऱ्या स्थानी आहे. चहलने पंजाबच्या डावातील 16 वे षटक टाकले. यादरम्यान त्याने चौथ्या चेंडूवर जितेश शर्माची विकेट घेतली. चहलने फेकलेला चेंडू जितेशने फटकावण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला लागून थेट लाँग ऑफवर उभ्या असलेल्या रियान परागच्या हातात गेला. याचबरोबर चहलच्या आयपीएल कारकिर्दीतील ही 171 वी विकेट ठरली. या सामन्यात चहलने चार षटकात 50 धावा दिल्या. मात्र विकेट घेताच तो विक्रम रचण्यात यशस्वी ठरला.

चहल (Yuzvendra Chahal) 133 सामन्यात 171 विकेट घेण्यात यशस्वी झाला आहे. या यादीत विंडीजचा ब्राव्हो 161 सामन्यात 183 विकेट घेत पहिल्या स्थानी आहे. श्रीलंकेचा लसिथ मलिंगाच्या नावावर 122 सामन्यात 170 विकेट्स आहेत. यानंतर अमित मिश्राचे नाव आहे. ज्याने 154 सामन्यात 166 विकेट घेतल्या आहेत.

अधिक वाचा :

Back to top button