Ronaldo in India : फुटबॉल चाहत्यांसाठी खुशखबर; रोनाल्डो भारतात खेळणार? काय आहे समीकरण | पुढारी

Ronaldo in India : फुटबॉल चाहत्यांसाठी खुशखबर; रोनाल्डो भारतात खेळणार? काय आहे समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क :  स्‍टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला स्‍टेडियममध्‍ये प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचे स्वप्न फुटबॉलप्रेमींचे असते. पोर्तुगालच्या या कर्णधाराचे जगभरात चाहते आहेत. भारतातही त्‍याचे कोट्यवधी चाहते आहेत. त्‍यांना रोनाल्डोला भारतात खेळताना पाहायचे आहे. त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. रोनाल्डो या वर्षाच्या अखेरीस भारतात खेळू शकतो. (Ronaldo in India) या माग फुटबॉलमधील समीकरण जाणून घेवूया

इंडियन सुपर लीग ( आयएसएल ) स्‍पर्धेत मंगळवारी मुंबई सिटी एफसीने क्लब प्लेऑफ सामन्यात जमशेद एफसीचा ३-१ असा पराभव केला. या विजयासह, ते AFC चॅम्पियन्स लीग २०२३-२४ च्या गट फेरीसाठी पात्र ठरले आहेत. एएफसी चॅम्पियन्स लीगमधील गट फेरीचे सामने १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. (Ronaldo in India)

रोनाल्डो भारतात येण्यामागे काय आहे समीकरण

 ख्रिस्तियानो रोनाल्डोने गेल्या वर्षीच्या अखेरीस सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबशी करार केला. सौदी प्रोफेशनल लीगमध्ये त्याचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. या संघाने किंग्स चषकाची उपांत्य फेरीही गाठली आहे. हा संघ आता एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये प्रवेश करू शकतो. अल नासर संघाने सौदी प्रोफेशनल लीगमध्ये अव्वल स्थान पटकावले किंवा किंग्स कप फायनल जिंकली तर तो AFC चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरतील.

भारत आणि सौदी अरेबिया AFC चॅम्पियन्स लीगच्या पश्चिम विभागात आहेत. अशा स्थितीत मुंबई सिटी आणि अल नासरचा संघ एकाच गटात सामील होऊ शकतो. असे झाल्यास, मुंबई सिटी एका सामन्यासाठी रियाधला जाईल आणि अल नासर एका सामन्यासाठी भारतात जाईल. असे झाले तर रोनाल्‍डोचा खेळ प्रत्‍यक्ष पाहण्‍याची संधी त्‍याच्‍या भारतातील चाहत्‍यांना मिळणार आहे.

अल नासर आणि रोनाल्डोची कामगिरी

सौदी प्रोफेशनल लीगच्या सध्‍याच्‍या हंगामात अल नासर संघाने चांगली कामगिरी केली आहे. या संघाचे २२ सामन्यांत ५२ गुण आहेत. पहिल्या क्रमांकावर असलेल्या अल-इतिहादनंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. अल-इतिहादचे २२ सामन्यांत ५३ गुण आहेत. लीगमध्ये अजून आठ सामने बाकी आहेत. अल नासरला पॉईंटटबलच्या अव्वलस्थानी पोहोचण्याची संधी आहे. २४ एप्रिल रोजी किंग्स कपच्या उपांत्य फेरीत त्यांचा सामना अल-वेहदाशी होईल. हा सामना जिंकल्यानंतर ती अंतिम फेरीत पोहोचेल. तिथे त्याचा सामना अल-इतिहाद किंवा अल-हिलाल यापैकी एक असेल. या स्पर्धेचा अंतिम सामना मे महिन्यात होणार आहे.

हेही वाचा;

Back to top button