Shreyas Iyer : श्रेयस अय्यर WTC फायनलमधून बाहेर; टीम इंडियाला मोठा झटका

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर WTC फायनलमधून बाहेर; टीम इंडियाला मोठा झटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल सुरू असतानाच केकेअर आणि टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) त्याच्या पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाणार आहे, त्यामुळे तो आयपीएल आणि जूनमध्ये होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही.

अय्यर (Shreyas Iyer) पाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी विदेशात जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी त्याला किमान तीन महिने लागतील. त्यानंतरच तो सराव सुरू करू शकेल.

पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस (Shreyas Iyer) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीतून बाहेर पडला होता. यानंतर, तो वनडे मालिकेतही भारतीय संघाचा भाग होऊ शकला नाही. श्रेयस गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर असतानाही या दुखापतीमुळे हैराण झाला होता. त्याला चालण्यातही अडचणी येत होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news