WBC 2023 : लव्‍हलिना बनली वर्ल्ड चॅम्पियन, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्‍य भारताचा 'सुवर्ण' चौकार | पुढारी

WBC 2023 : लव्‍हलिना बनली वर्ल्ड चॅम्पियन, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्‍य भारताचा 'सुवर्ण' चौकार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची बॉक्सिंगपटू इतिहास घडवला आहे. भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेन हिने ७५ किलो वजन गटात सुवर्णपदकावर मोहर उमटवली आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करचा ५-२ असा पराभव केला. तिच्‍या या कामगिरीमुळे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने चाैथ्‍या सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे. (WBC 2023)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये लव्हलिना हिने कास्‍य पदक पटकावले होते. त्‍यामुळे महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये देशवासीयांना तिच्‍याकडून मोठ्या अपेक्षा होत्‍या. तिने दमदार खेळाचे प्रदर्शन घडवत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

WBC 2023 : भारताचा ‘सुवर्ण’ चौकार

शनिवारी ( दि. २५) नीतू घनघासने ४८ किलो गटात सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर स्वीटी बुरा हिने ८१ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. स्वीटीने चीनच्या लिना वॉन्गचा ४-३ असा पराभव केला होता. यानंतर निखत जरीनने ५० किलो गटात सुवर्णपदकावर मोहर उमटवली.  अंतिम सामन्यात निखतने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. तिने पहिल्या फेरीत ५-0 अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या फेरीतही ही आघाडी कायम ठेवली. तिसऱ्या फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी टॅम बॉक्सरवर जोरदार ठोसा लगावला. पंचांनी व्हिएतनामी बॉक्सरची प्रकृती जाणून घेण्यासाठी सामना थांबवला. याचवेळी निखतचा विजय निश्चित झाला होता. अखेरीस तिने ५-०च्या फरकाने सामना जिंकला. आणि सलग दुसऱ्यांदा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्‍ये सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली.

हेही वाचा : 

 

Back to top button