चारधाम यात्रेसाठी ६.३४ लाख भाविकांची नोंदणी : उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेची माहिती | पुढारी

चारधाम यात्रेसाठी ६.३४ लाख भाविकांची नोंदणी : उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदा चारधाम यात्रेसाठी ६.३४ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी केदारनाथ धामसाठी २.४१ लाख आणि बद्रीनाथ धामसाठी २.०१ लाख, यमनोत्री धामसाठी ९५,१०७ आणि गंगोत्री धामसाठी ९६,४४९ भाविकांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेने आज (दि.२६) दिली.

चारधाम यात्रेदरम्यान 50 आरोग्य एटीएम तैनात करण्यासाठी सामंजस्य करार केला, ज्याद्वारे भाविकांना गढवाल विभागातील ओळखल्या गेलेल्या वैद्यकीय युनिटमध्ये वैद्यकीय सेवा मिळणार आहे, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी दिली.

मुख्यमंत्री धामी म्‍हणाले होते की, “चारधाम यात्रेदरम्यान आरोग्य तपासणीसाठी हेल्थ एटीएम उभारण्यात येणार आहे. या सुविधेमुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळणार आहेत. हेल्थ एटीएम रुग्णाचे वजन, उंची, रक्तदाब, रक्तातील साखर, शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन संपृक्तता तपासू शकतात. चारधाम यात्रेदरम्यान यात्रेकरूंना आरोग्यासंबंधी कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी आरोग्य सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत.”

हेही वाचा 

 

 

 

Back to top button