IPL 2023 : धोनी आणि केएल राहुलच्या संघाना झटका! ‘या’ गोलंदाजांचे खेळणे कठीण | पुढारी

IPL 2023 : धोनी आणि केएल राहुलच्या संघाना झटका! ‘या’ गोलंदाजांचे खेळणे कठीण

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस बाकी आहेत, परंतु त्याआधी महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि लखनऊचा 24 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहसिन खान यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी आयपीएल 2022 मध्ये आपापल्या संघासाठी पदार्पण केले, परंतु दुखापतीमुळे त्यांना यंदाच्या हंगामात खेळणे कठीण झाले आहे.

मुकेशने गेल्या हंगामात घेतल्या 16 विकेट

गेल्या आयपीएल (IPL 2023) हंगामात मुकेश चौधरी आणि मोहसीन खान यांनी आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. दोघांनाही त्यांच्या फ्रँचायझींनी प्रत्येकी 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले. मुकेशने तर 13 सामन्यात 16 विकेट घेऊन सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या शर्यतीत आपला ठसा उमटवाला होता. पण यंदा मात्र हा गोलंदाज खेळता दिसणार नसल्याची दाट शक्यता आहे. सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी मुकेशची आम्ही वाट पाहत आहोत, पण यंदा तो संघाचा भाग होईल की नाही यावर निश्चितपणे सांगता येणार नाही. गेल्या वर्षी तो आमच्या गोलंदाजी युनिटचा महत्त्वाचा भाग होता. पण यावेळी तो दुखपतीने जर मैदानात उतरू शकला नाही तर ते संघासाठी दुर्दैवी असेल, असे स्पष्ट केले. मुकेश सध्या त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये फिटनेसवर काम करत आहे.

मोहसीनने लखनौसाठी 9 सामन्यात 14 विकेट घेतल्या

मोहसीन खानने गेल्या आयपीएल (IPL 2023) हंगामात मोसमात लखनौसाठी खेळताना 9 सामने खेळले. ज्यात त्याने 5.97 च्या इकॉनॉमी रेटने चांगली गोलंदाजी केली आणि 14 विकेट घेतल्या. तो या संघातील स्टार परफॉर्मरपैकी एक होता. या संघाने पदार्पणाच्या आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मोहसीन सध्या लखनौमध्ये फ्रँचायझीसोबत प्रशिक्षण घेत आहे, पण तो प्लेईंग इलेव्हनमध्ये उतरेल की नाही याबाबत लखनऊ फ्रँचायझीने काहीही स्पष्ट केलेले नाही.

Back to top button