IPL Fact : ‘या’ 8 विदेशी गोलंदाजांनी जिंकली पर्पल कॅप, 2008 मध्ये पाक गोलंदाजाने मारली होती बाजी | पुढारी

IPL Fact : ‘या’ 8 विदेशी गोलंदाजांनी जिंकली पर्पल कॅप, 2008 मध्ये पाक गोलंदाजाने मारली होती बाजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Fact : आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगच्या इतिहासातील पहिली पर्पल कॅप पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाने जिंकली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकणारे एकूण 8 विदेशी गोलंदाज आहेत.

पहिल्या पर्पल कॅपवर पाकिस्तानी गोलंदाजाची बाजी

आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणाऱ्या विदेशी गोलंदाजांपैकी एक पाकिस्तानचा आहे. सोहेल तनवीर असे या गोलंदाजाचे नाव असून त्याने 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात 22 विकेट घेत हा पुरस्कार जिंकला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्या सत्रापासून पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळले नाहीत. या यादीत लसिथ मलिंगा ते इम्रान ताहिर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. (IPL Fact)

पर्पल कॅप काय आहे? (IPL Fact)

2008 मध्ये जेव्हा बीसीसीआयने आयपीएलचा पहिला हंगाम सुरू केला तेव्हा या लीगमधील खेळाडूंसाठी अनेक पुरस्कार ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक पर्पल कॅप देखील होती. हा पुरस्कार मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिला जातो. या पुरस्कारासाठी लीगदरम्यान अनेक गोलंदाजांमध्ये स्पर्धा असते. हा पुरस्कार जिंकण्यासाठी प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त विकेट्स घेण्याचा प्रयत्न करतो.

आयपीएलच्या इतिहासात पर्पल कॅप मिळालेले विदेशी गोलंदाज (IPL Fact)

सोहेल तन्वीर (राजस्थान) : 22 विकेट : वर्ष 2008
लसिथ मलिंगा (मुंबई) 28 विकेट : वर्ष 2011
मार्ने मॉर्केल (दिल्ली) : 25 विकेट : वर्ष 2012
ड्वेन ब्राव्हो (चेन्नई) 32 विकेट : वर्ष 2013
ड्वेन ब्राव्हो (चेन्नई) विकेट 26 : वर्ष 2015
अँड्र्यू टाय (पंजाब) विकेट 24 : वर्ष 2018
इम्रान ताहिर (चेन्नई) विकेट 26 : वर्ष 2019
कागिसो रबाडा (दिल्ली) विकेट 30 : वर्ष 2020

Back to top button