Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या नावावर तीन ‘भोपळे’

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या नावावर तीन ‘भोपळे’
Published on
Updated on

भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत खातेही उघडता आले नाही. तीन सामन्यांच्या मालिकेतील सर्व डावात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तीन सामन्यांत त्याच्या नावापुढे तीन झीरो लागले. पहिल्या सामन्यात आणि दुसर्‍या सामन्यात सूर्याला स्टार्कने एलबीडब्ल्यू करून बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर चेन्नईतील सामन्यात तो अ‍ॅश्टर अ‍ॅगरचा शिकार झाला. तीन सामन्यांत सूर्यकुमार यादवच्या बॅटला एकही चेंडू न लागल्याने त्याच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. सलग तीन डावांत खाते न उघडता बाद झाल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे, पण सलग तीन वन-डे डावात खाते न उघडणारा सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय फलंदाज नाही. त्याच्या आधी पाच खेळाडूंना याचा सामना करावा लागला आहे. (Suryakumar Yadav)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील सलग तीन वन-डे डावात खाते न उघडता बाद झाला आहे. 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध, 2018 मध्ये वेस्ट इंडिज आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नव्हते. 10 किंवा 11 व्या क्रमांकावर खेळल्यामुळे त्याची फलंदाजी बर्‍याच काळानंतर येते. इशांत शर्माचा देखील या यादीत समावेश आहे. 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खाते न उघडता बाद झाल्यानंतर त्याला 2011 मध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली. तेव्हा वेस्ट इंडिज दौर्‍यावर असताना तो सलग दोनवेळा डक बाद झाला. (Suryakumar Yadav)

भारताचा माजी गोलंदाज झहीर खानच्या नावावर देखील या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद आहे. 2003 आणि 2004 मध्ये सलग तीन डावांत तो शून्यावर बाद झाला होता. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज अनिल कुंबळे याच्या नावावर कसोटीत शतक आहे, पण 1996 मध्ये त्याला सलग 3 वन-डे डावांत खाते उघडता आले नव्हते. यामधील दोन वन-डे सामने इंग्लंडविरुद्ध आणि एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतक ठोकणार्‍या सचिन तेंडुलकरचा देखील या यादीत समावेश आहे. 1994 मध्ये सचिन श्रीलंकेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. त्याच्या पुढच्या डावात तो वेस्ट इंडिजविरुद्ध 2 डावांत शून्यावर बाद झाला होता, पण तिसर्‍या डक नंतर त्याने शतक ठोकून शानदार पुनरागमन केले होते.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news