Parineeti Chopra And Raghav Chadha : परिणीती चोप्रा करतेय ‘या’ आप नेत्याला डेट? डिनर भेटीवरुन चर्चेला उधाण (Photos Viral) | पुढारी

Parineeti Chopra And Raghav Chadha : परिणीती चोप्रा करतेय ‘या’ आप नेत्याला डेट? डिनर भेटीवरुन चर्चेला उधाण (Photos Viral)

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राजकारण आणि बॉलिवूड यांचे नाते जुने आहे. अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकारणातील दिग्गजांची नावे जोडली गेली आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की आपण असे का म्हणतोय? बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून अशीच एक बातमी समोर आली आहे, जी जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. खरं तर, काल संध्याकाळी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा मुंबईत आम आदमी पक्षाचे प्रसिद्ध नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत दिसली. (Parineeti Chopra And Raghav Chadha)

दोघेही अशाप्रकारे एकत्र कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लोक बांधू लागले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यादरम्यान राघव पांढऱ्या शर्ट आणि पॅन्टमध्ये तर परिणीतीही पांढऱ्या शर्ट आणि चेक पॅन्टमध्ये दिसली. दोघांचा हा लूक पाहण्याजोगा होता. हे फोटो समोर आल्यानंतर चाहते विचारू लागले आहेत की दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? (Parineeti Chopra And Raghav Chadha)

Parineeti Chopra And Raghav Chadha

नुकतेच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना ‘इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील व्यक्तींना हा सन्मान पहिल्यांदाच कुणाला मिळाला आहे. यूकेच्या मँचेस्टर स्कूलची परिणिती चोप्रा विद्यार्थिनी आहे. दुसरीकडे, राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून प्रशिक्षण घेतले आहे. दोघेही अभ्यासात टॉपर होते. अशा परिस्थितीत असे देखील होऊ शकते की दोघे चांगले मित्र आहेत. पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर परिणीती सध्या सिंगल आहे, तर राघवही अद्याप बॅचलर आहेत.


अधिक वाचा :

Back to top button