

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएलमध्ये ७ वा सामना खेळवला जात आहे. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने आहेत. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीने .१६२ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या ३२ चेंडूमध्ये ३७ धावा, अक्षर पटेलच्या २२ चेंडूमध्ये ३६ धावा आणि सर्फराज खानच्या ३४ चेंडूमध्ये ३० धावा केल्या याच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या आणि गुजरात टायटन्ससमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले आहे.
गुजरातला धावापर्यंत रोखण्यात दिल्ली कॅपिटल्सला यश आले आहे. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने ३ विकेट्स पटकावल्या. तर मोहम्मद शमी आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. गुजरातच्या गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीच्या एकाही खेळाडूला ४० धावांचा टप्पा पार करता आला नाही.