Sanjita Chanu Ban : कॉमनवेल्थ चॅम्पियन भारतीय वेटलिफ्टर संजिता चानूवर 4 वर्षांची बंदी | पुढारी

Sanjita Chanu Ban : कॉमनवेल्थ चॅम्पियन भारतीय वेटलिफ्टर संजिता चानूवर 4 वर्षांची बंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sanjita Chanu Ban : दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन ठरलेली भारताची वेटलिफ्टर संजिता चानूवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी डोप चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने तिच्यावर नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (NADA) कारवाई केली आहे.

गुजरातमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळादरम्यान जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीच्या (WADA) प्रतिबंधित यादीत असलेल्या अॅनाबॉलिक स्टिरॉइड-ड्रोस्टॅनोलोनच्या मेटाबोलाइटसाठी संजिताची चाचणी पॉझिटीव्ह आली होती. स्पर्धेदरम्यान 30 सप्टेंबर 2022 रोजी डोप चाचणीसाठी त्याचा नमुना घेण्यात आला होता. चार वर्षांची बंदी चानूच्या करिअरला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. (Sanjita Chanu Ban)

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी संजितावर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली. सहदेव यादव म्हणाले की, डोप चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चार वर्षांची बंदी घातली आहे. संजितासाठी हा मोठा धक्का आहे. तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जिंकलेले रौप्य पदक परत घेण्यात आले. मात्र, याबाबत संजिताने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

संजिताने 2014 मध्ये ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये संजिताने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. 2018 मध्ये गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्याने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. नाडाच्या निर्णयाला संजिता आव्हान देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Back to top button