नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : आयपीएल २०२३ पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला होता. अलीकडेच या संघाचा कर्णधार ऋषभ पंत मोठ्या अपघाताचा बळी ठरला होता. त्यानंतर या खेळाडूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर ऋषभ पंत बरा होत आहे. यामुळे तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याचमुळे ऋषभ पंत आयपीएल 2023 च्या मोसमात खेळू शकत नाही. मात्र, ऋषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, तो दिल्ली कॅपिटल्सचा सामना पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचला आहे आणि तो आपल्या संघाचे मनोबल वाढवत आहे. (Rishabh Pant In IPL)
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने भिडले आहेत. त्याचवेळी, या सामन्यात ऋषभ पंत आपल्या टीम दिल्ली कॅपिटल्सला सपोर्ट करण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचला आहे. सध्या ऋषभ पंतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय आपल्या आवडत्या खेळाडूला बऱ्याच दिवसांनी पाहून चाहते खूप आनंदी व भारवलेले दिसत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते सतत कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया देत आहेत.
नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने निवडली गोलंदाजी
विशेष म्हणजे आज (मंगळवारी) अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रथम फलंदाजी करत असून १५ षटकांचा खेळ झाला आहे. या १५ षटकात दिल्ली अवस्था बिकट झाली असून दिल्लीच्या संघाने १५ षटकात ५ बळी गमावून फक्त १२१ धावा केल्या आहेत.
तर दुसरीकडे गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना जखडून ठेवत ठरावीक अंतरावर त्यांचे बळी टिपण्यात यशस्वी झाले आहेत. मोहम्मद शमी आणि अल्जारी जोसेफ आणि प्रत्येकी २ तर राशिद खान याने १ बळी घेण्यात यशस्वी ठरले आहेत.
अधिक वाचा :