IND vs AUS 2nd ODI : मालिकेतील दुसर्‍या वन-डे सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव | पुढारी

IND vs AUS 2nd ODI : मालिकेतील दुसर्‍या वन-डे सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन वन-डे सामन्यांच्‍या मालिकेतील दुसरा सामना आज ( दि. १९) विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. या सामन्‍यात ऑस्ट्रेलियाने भारताचा लाजिरवाणा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव अवघ्‍या ११७ धावांवर संपुष्‍टात आला. हे आव्हान ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श आणि हेड यांनी बिनबाद केवळ ११ षटकांमध्‍ये पूर्ण केले. हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधली आहे. (IND vs AUS)

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श आणि हेड यांनी मैदानावर फटकेबाजी करत हे आव्हान ११ ओव्हरमध्ये पूर्ण केले. यामध्ये मिचेल मार्शने ३६ चेंडूत ६६ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ६ षटकार फटकावले. तर हेडने ३० चेंडूत ५१ धावा केल्या. त्‍याच्‍या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. (IND vs AUS)

सामन्याच्या सुरूवातीला नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत वेगवान गोलंदाज मिचेल स्‍टार्क याने टीम इंडियाच्‍या फलंदाजांची भंबेरी उडवली. त्‍याने घेतलेल्‍या ५ विकेटच्‍या जोरावर ऑस्‍ट्रेलियाने भारताचा डाव अवघ्‍या ११७ धावांमध्‍ये गुंडाळला.

स्टार्कचा धमाका; ११७ धावांत टीम इंडियाला गुंडाळले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत वेगवान गोलंदाज मिचेल स्‍टार्क याने टीम इंडियाच्‍या फलंदाजांची भंबेरी उडवली. त्‍याने घेतलेल्‍या ५ विकेटच्‍या जोरावर ऑस्‍ट्रेलियाने भारताचा डाव अवघ्‍या ११७ धावांमध्‍ये गुंडाळला.

स्‍टार्कचा भेदक मारा, निम्‍मा संघ तंबूत पाठवला

आपल्या भेदक गोलंदाजीने मिचेल स्टार्कने दुसर्‍या वन-डेमध्‍ये पाच विकेट घेतल्‍या. त्‍याने टीम इडियाचे सलामीवीर रोहित शर्मा, शुभमन गिल यांच्‍यासह सूर्यकुमार यादव, के.एल. राहूल आणि सिराजची विकेट त्‍याने घेतली. स्‍टार्कला नेथन इलियन, ॲबघीट आणि ग्रीनची साथ मिळाली. या तिघांनी अनुक्रमे 3, 2 आणि १ विकेट घेतली. केवळ विराट कोहली आणि अक्षर पटेल या दोघा फलंदाजांनी ऑस्‍ट्रेलियाच्‍या भेदक मार्‍याला तोंड दिले. विराटने ३१ धावा केल्‍या. तर अक्षर २९ धावांवर नाबाद राहिला.

भारतीय फलंदाजांची हाराकिरी

सलामीवीर शुभमनसह टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज सूर्यकुमार यादव, मोहम्‍मद शमी आणि मोहम्‍मद सिराज यांना धावांचे खातेही उघडता आले नाही. भारताचे चार फलंदाज शून्‍यवर बाद झाले. कर्णधार रोहित शर्मा १३ धावांवर तर रवींद्र जडेजा 16 धावाकरून बाद झाला. हार्दिक पंडया एका धाव करून बाद झाला. यामध्ये भारताच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडी ही गाठता आला नाही. तसेच ११७ ही भारताची तिसरी निचांकी धावसंख्या आहे भारताचा डाव अवघ्‍या ११७ धावांवर संपुष्‍टात आली.

हेही वाचा; 

Back to top button