Gambhir on AB : चिन्नास्वामीवर असले विक्रम कोणीही करू शकतो; गौतम गंभीरची डिव्हिलियर्सवर टीका

Gambhir on AB : चिन्नास्वामीवर असले विक्रम कोणीही करू शकतो;  गौतम गंभीरची डिव्हिलियर्सवर टीका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रमांव्यतिरिक्त, डिव्हिलियर्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये लाखो चाहते निर्माण केले आहेत. मिस्टर 360 या नावाने प्रसिद्ध असलेल्या या फलंदाजाने आपल्या जोरदार फटकेबाजीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला नव्या उंचीवर नेले. क्रिकेट विश्वात मजबूत रेकॉर्ड असूनही त्याच्यावर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने टीका केली आहे. गंभीर म्हणतो की, डिव्हिलियर्सने फक्त त्याच्या विक्रमासाठी फलंदाजी केली. (Gambhir on AB)

डिव्हिलियर्सने 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 2011 मध्ये आरसीबीने त्याला आपल्या संघात घेतले. त्याने 158.33 च्या स्ट्राइक रेटने 4522 धावा केल्या आणि बंगळुरूसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. 2021 मध्ये त्यांने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. डीव्हिलियर्सने आरसीबीसाठी दोन शतके आणि 37 अर्धशतके झळकावली आहेत. डिव्हिलियर्सने १८४ आयपीएल सामन्यांमध्ये 39.71 च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या. यामध्ये तीन शतके आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. (Gambhir on AB)

भारताचा माजी फलंदाज आणि दोन वेळचा आयपीएल चॅम्पियन गौतम गंभीरने डिव्हिलियर्सबद्दल आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, 'आरसीबी'सोबतच्या त्याच्या दशकभराच्या कारकिर्दीत डिव्हिलियर्स केवळ वैयक्तिक विक्रमच करू शकला. गंभीरने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, "जर चिन्नास्वामी स्टेडियमसारख्या छोट्या मैदानात एबी डिव्हिलियर्ससारखा कोणी 8-10 वर्षे खेळला असता तर त्याचा स्ट्राइक रेट सारखाच राहिला असता. सुरेश रैनाच्या नावावर चार आयपीएल ट्रॉफी आहेत आणि डिव्हिलियर्सच्या नावावर वैयक्तिक रेकॉर्ड आहे. गंभीरचे हे विधान आरसीबीच्या चाहत्यांना फारसे पटले नाही. त्यांनी गंभीरला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

गंभीर दोनवेळचा आयपीएलचा चॅम्पियन

गंभीरने 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली आणि 2011 मध्ये त्याला कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधार म्हणून आपल्या संघात घेतले. त्यानंतर त्याने फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जला पराभूत करून अनुक्रमे 2012 आणि 2014 आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. गंभीरने 154 आयपीएल सामन्यांमध्ये 36 अर्धशतकांसह 4218 धावा केल्या आहेत.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news