Kylian Mbappe : एम्बाप्पे ठरला ‘पीएसजी’साठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, मोडला कवानीचा विक्रम | पुढारी

Kylian Mbappe : एम्बाप्पे ठरला 'पीएसजी'साठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, मोडला कवानीचा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : एम्बाप्पे शनिवारी फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेनसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. त्याच्या संघाने लीग वनमध्ये नॅन्टेसवर 4-2 असा विजय मिळवला. एम्बाप्पेने दुखापतीच्या वेळेत गोल केला. ‘पीएसजी’साठी हा त्याचा 201 वा गोल होता. एम्बाप्पेने मार्सेलविरुद्धच्या विजयात केलेल्या गोलसह एडिन्सन कवानीच्या 200 गोलच्या विक्रमाची बरोबरी केली. शनिवारी झालेल्या सामन्यात दुखापतीच्या वेळेत गोल करून पॅरिस सेंट जर्मनकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. (Kylian Mbappe)

‘पीएसजी’ने सुरुवातीच्या २० मिनिटांत दोन गोलांची आघाडी घेतली होती. लिओनेल मेस्सीने 12व्या मिनिटाला आणि नॅनटेसच्या जावेन हदजमने 17व्या मिनिटाला स्वयंगोल केला. यानंतर 31व्या मिनिटाला लुडोविक ब्लासने आणि 38व्या मिनिटाला इग्नेशियस ग्नॅगोने गोल करून स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला. यानंतर एमबाप्पेच्या असिस्टवर डॅनिलो परेराने पीएसजीसाठी तिसरा गोल केला. दुखापतीच्या वेळेत एमबाप्पेने गोल करत पीएसजीला विजय मिळवून दिला. (Kylian Mbappe)

एमबाप्पेने केवळ 247 सामन्यांमध्ये 201 गोल केले आहेत. उरुग्वेचा स्टार कावानीने २०२० मध्ये हा विक्रम केला होता. मात्र, यासाठी त्याने पीएसजीकडून 298 सामने खेळले होते. हा विक्रम आपल्या नावावर केल्यानंतर एमबाप्पेलाही सामन्यानंतर क्लबने ट्रॉफी देऊन सन्मानित केले.

हेही वाचा : 

Back to top button