AUSWvsINDW : भारत-ऑस्‍ट्रेलिया गुलाबी कसोटी अनिर्णित - पुढारी

AUSWvsINDW : भारत-ऑस्‍ट्रेलिया गुलाबी कसोटी अनिर्णित

क्विन्सलँड; पुढारी ऑनलाईन: ( AUSWvsINDW ) भारत-ऑस्ट्रेलिया संघातील एकमेव गुलाबी कसोटी सामना अनिर्णित राहिला.  दुसर्‍या डावात ऑस्‍ट्रेलियाने २ बाद ३६ धावा केल्‍या. हा सामना अनिर्णित राहिला असला तरी सामन्‍यावर भारतीय संघाचे वर्चस्‍व राहिले. या सामन्‍यात ऐतिहासिक शतकीखेळी करणार्‍या स्‍मृती मानधनाला सामनवीर म्‍हणून गौरविण्‍यात आले.

आठ गडी बाद ३७७ धावा केल्‍यावर भारताने पहिला डाव घोषित केला होता

. पहिल्‍या डावात भारतीय महिला संघाचे वर्चस्‍व दिसून आले. झुलन गोस्‍वामी आणि पूजा वस्‍त्रकार यांच्‍या भेदक मार्‍यामुळे भारतीय संघाने पहिल्‍या डावात १८७ धावांची आघाडी घेतली होती.

चौथ्‍या दिवशी २४१ धावांवर ९ गडी बाद झाले. यानंतर ऑस्‍ट्रेलियाने आपला डाव घोषित केला.

भारताने ३ गडी गमावल्‍यानंतर १३५ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला.

भारतीय संघाने ऑस्‍ट्रेलियासमोर २७२ संघांला २७२ धावांचे लक्ष्‍य दिले. शेवटच्‍या दिवशी ऑस्‍ट्रेलियाने दोन बाद ३५ धावा केल्‍या.

या सामन्‍यात ऐतिहासिक शतकीखेळी करणार्‍या स्‍मृती मानधनाला सामनवीर म्‍हणून गौरविण्‍यात आले.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button