

शारजाह ; वृत्तसंस्था : (RCB vs PBKS IPL 2021) युजवेंद्र चहलच्या तीन विकेटस् आणि त्याला अन्य गालंदाजांनी दिलेली साथ यामुळे चुरशीच्या सामन्यात बंगळूर रॉयल चॅलेंजर्सने पंजाब किंग्ज संघावर 6 धावांनी विजय मिळवला. बंगळूरच्या या विजयामुळे 'प्ले ऑफ'मधील चुरस वाढली आहे.
विजयासाठी 165 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जचे सलामीवीर के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी आक्रमक सुरुवात केली. के.एल. राहुलने 35 चेंडूंत 39 धावा केल्या. मयंक अग्रवालने 36 चेंडूंत अर्धशतक झळकावले.मयंक 42 चेंडूंत 57 धावा करून परतला. अखेर पंजाब संघाला 6 बाद 158 धावांपर्यंत मजल मारली.
तत्पूर्वी, ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळूर संघाने 164 धावा केल्या. बंगळूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. 24 चेंडूंत 25 धावा करून विराट माघारी परतला. विराट आणि ख्रिस्टियन यांना सलग दोन चेंडूंवर हेन्रिक्स बाद केले. पडिक्कल 40 धावांची उपयुक्त खेळी केली.
त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक फटकेबाजी करीत 33 चेंडूंत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये त्याने चार षटकार आणि तीन चौकार लगावले. अखेर 20 षटकांत बंगळूर संघाने 7 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली. पंजाब किंग्ज संघाकडून मोहम्मद सामी आणि हेन्रिक्सने प्रत्येकी 3 विकेटस् घेतल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : (20 षटकांत 7 बाद 164) मॅक्सवेल 57, पडिक्कल 40, मोहम्मद सामी 3/39, हेन्रिक्स 3/12.
पंजाब किंग्ज : (20 षटकांत 6 बाद 158) मयांक अग्रवाल 57, के.एल.राहुल 39. युजवेंद्र चहल 3/29.