Manoj Bajpai : अभिनेता मनोज वाजपेयीच्या वडिलांचं निधन | पुढारी

Manoj Bajpai : अभिनेता मनोज वाजपेयीच्या वडिलांचं निधन

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : बाॅलिवूडचा अभिनेता (Manoj Bajpai)  मनोज वायपेयी याचे वडील राधाकांत वाजपेयी यांच आज सकाळी निधन झालं. ते ८५ वर्षांचे  होतं. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.

मागील काही दिवसांपासून मनोज वायजेपी (Manoj Bajpai) याच्या वडिलांवर दिल्लीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.

या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वडील आजारी असल्याची बातमी कळताच मनोज हा केरळमध्ये सुरू असलेलं शुटिंग सोडून दिल्लीत आला.

मनोजच्या वडिलांचं निधन झाल्याच्या बातमीला ‘SHE’चे संचालक अविनाश दास यांनी दुजोरा देत ट्विट केलेलं आहे.

दास यांनी एक फोटो ट्विट करत म्हटलं आहे की, “मनोज भैय्याचे वडील आता नाहीत. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आता आठवत आहे. मी हा फोटो भितिहरवा आश्रमात काढला होता.”

“मनोज भैय्याचे वडील हे महान सहनशक्ती असलेलं व्यक्तीमत्व होतं. त्यांनी नेहमीचं स्वतःला मुलाच्या संपत्तीपासून  बाजूला ठेवलेलं होतं. माफक विनकाम करणारे ते एक मोठे व्यक्ती होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा आशयाचं ट्विट अविनाश दास यांनी केलं आहे.

राधाकांत वाजपेयी यांच्या जाण्याने त्यांचे मूळ गाव गौनाहा खंडाच्या बेलव्यात शोककळा पसरली आहे.

गावकऱ्यांच्या मते राधाकांत वायरेयी हे खूप दयाळू आणि गरिबांना मदत करणारे होते.

मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना दिल्लीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मनोज हा राधाकांत वाजपेयी यांच्या तीन मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा आहे.

मनोजला एका छोट्या खेडेगावातून मुंबईला पोहोचविण्यात वडिलांचा मोठा वाटा होता.

मनोज एक मुलाखतीत सांगतो की, “वडील नेहमी पहिल्यांदा अभ्यास करण्याचा सल्ला द्यायचे.

बिहारमधून दिल्ली गाठत वडिलांच्या इच्छेसाठी मी विद्यापाठीतून पदवी प्राप्त केली. कारण, वडिलांचं स्वप्न होतं.”

पहा व्हिडीओ : जेष्ठ नागरिक स्पेशल स्टोरी : आयुष्याची सायंकाळ जगा आनंदाने

Back to top button