Ravindra Jadeja : ५०० बळी घेणारा अन् ५००० धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विशेष विक्रम आपल्या नावावर केला आहे. जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स पटकावण्याचा विक्रम केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रायव्हस हेड याला बाद करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Ravindra Jadeja) शिवाय आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० बळी आणि ५००० धावा पूर्ण करणारा रवींद्र जडेजा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनीच हा टप्पा गाठला आहे.

जडेजाचे (Ravindra Jadeja) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन झाले असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर आणि दिल्ली कसोटीत त्याने शानदार कामगिरी केली. या दोन्ही सामन्यांत त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' या पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतील तिसरा सामन्यास इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरूवात झाली आहे.

रवींद्र जडेजाने आजवर २४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याने ५५२७ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतक आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. जडेजाने २९८ सामने खेळत ५०३ विकेट्सही पटकावल्या आहेत. रवींद्र जडेजाने ५०० विकेट्स पटकावत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्याशी बरोबरी केली आहे. (Ravindra Jadeja)

माजी कर्णधार आणि अष्टपैलू कपिल देवने (Kapil Dev) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०३१ धावा केल्या असून ६८७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्यांनी अनुक्रमे ५२४८ आणि ३७८३ धावा केल्या, तर कसोटीमध्ये त्यांनी ४३४ आणि वनडेमध्ये २५३ बळी मिळवले आहेत. या विक्रमामुळे कपिल यांची गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलूं खेळाडूंमध्ये होते. (Ravindra Jadeja)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news