IND vs NZ 3rd T20 : सूर्यकुमार 'सूपरमॅन', कॅच पाहाल तर म्हणाल, 'मानलं भावा'!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांना धडकी भरविणारा टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने बुधवारी न्यूझीलंड विरुद्धच्या तिसर्या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षणात कमाल केली. या सामन्यात त्याने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत तीन झेल पकडले. त्याच्या या कामगिरीने सामन्याचे चित्रच पालटले. नेहमी आपल्या फलंदाजीने विरोधी संघाला आवाक करणार्या सूर्यकुमारच्या क्षेत्ररक्षणाने न्यूझीलंडचे फलंदाजही आवाक झाले. ( IND vs NZ 3rd T20 )
IND vs NZ 3rd T20 : सूर्यकुमारची ‘झेप’ आणि न्यूझीलंडला ‘ब्रेक’
T20 मालिकेतील तिसर्या व अखेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर २३४ धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. कर्णधार हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर फिन ऍलन ३ धावा करुन बाद झाला. स्लिपमध्ये सूर्यकुमार यादव याने उंची उंडी मारत नेत्रदीपक झेल घेतला. त्याच पद्धतीने हार्दिकच्याच तिसर्या षटकातही ग्लेन फिलिप्सचा सूर्यकुमारने स्लिपमध्ये झेल टिपला.
सूर्यकुमारचे क्षेत्ररक्षणातील स्मरणीय प्रदर्शन एवढ्यावतच थांबले नाही. शिव मावीच्या पहिल्याच षटकात झ्रटपट धावा करण्याच्या प्रयत्नात असणार्या न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरचा उंच फटका लगावला. चेंडू हवेत खूप उंच अगदी सीमारेषेच्या जवळ गेला, यावेळी सूर्यकुमारने आपल्या शरीराचे संतुलन कायम ठेवत एका पायावर हा झेल टिपला. या सामन्यातील त्याचा हा तिसरा झेल ठरला. तिसर्या टी-२० सामन्यात शुभमन गिलच्या ६३ चेंडूत १२६ धावांची खेळीबरोबर सूर्यकुमार यादवचे क्षेत्ररक्षणाची चर्चा क्रिकटेप्रेमींमध्ये रंगली आहे.
ICYMI – WHAT. A. CATCH 🔥🔥#TeamIndia vice-captain @surya_14kumar takes a stunner to get Finn Allen 👏#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/WvKQK8V67b
— BCCI (@BCCI) February 1, 2023
हेही वाचा :
- IND vs NZ 3rdT20 : भारताचा न्यूझीलंडवर मोठा विजय, १६८ धावांनी उडवला धुव्वा; मालिकाही घातली खिशात
- England vs India 3rd T20I : सूर्य तळपला, पण पराभवाचा अंधार दाटला; इंग्लंड १७ धावांनी विजयी