IND vs NZ : भारताचा टी २० मध्ये सर्वात मोठा विजय; हार्दिकच्या नेतृत्वात सलग चौथी मालिका जिंकली | पुढारी

IND vs NZ : भारताचा टी २० मध्ये सर्वात मोठा विजय; हार्दिकच्या नेतृत्वात सलग चौथी मालिका जिंकली

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात लागोपाठी चौथी टी20 मालिका आपल्या नावावर केली आहे. भारताने मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडवर १६८ धावांनी विजय मिळवला. भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने २० षटकांमध्ये ४ विकेट गमावत २३४ धावा केल्या. शुभमन गिलने ६३ चेंडूमध्ये नाबाद १२६ धावांची शतकी खेळी केली. (IND vs NZ) भारताच्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ६६ धावाच करु शकला.

भारताचा टी20 क्रिकेटमधील सर्वांत मोठा विजय (IND vs NZ)

टी20 क्रिकेट इतिहासातील भारताचा हा सर्वांत मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भारताने आयर्लंडचा १४८ धावांनी पराभव केला होता. तर न्यूझीलंडला आजवरचा सर्वांत मोठा पराभव पत्करावा लागला आहे. यापूर्वी २०१० मध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा १०३ धावांनी पराभव केला होता. मागील वर्षे हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयरलँडचा आणि न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यानंतर यावर्षी भारताने श्रीलंका आणि न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. (IND vs NZ)

शुभमन गिलचे दमदार शतक (IND vs NZ)

भारताकडून शुभमन गिलने सर्वांत जास्त धावा केल्या. त्याने ६३ चेंडूमध्ये १२६ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि ७ षटकारांच्या सहाय्याने आपले शतक पूर्ण केले. शेवटच्या षटकापर्यंत शुभमन गिल खेळपट्टीवर टिकून होता. त्याचे टी20 क्रिकेटमधील हे पहिलेच शतक आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडकडून फक्त दोन फलंदाजांना समाधानकारक खेळी करता आली. डेरेल मिचेलने ३५ आणि कर्णधार मिचेल सँटनरने १३ धावा केल्या. भारताकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक ४ विकेट्स पटकावल्या. तर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावीने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. (IND vs NZ)

हेही वाचंलत का?

Back to top button