IND vs NZ 3rdT20 : भारताने टॉस जिंकला; प्रथम फलंदाजीचा निर्णय | पुढारी

IND vs NZ 3rdT20 : भारताने टॉस जिंकला; प्रथम फलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात विजय मिळवत मालिका नावावर करण्याच्या दृष्टीने दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. (IND vs NZ 3rdT20)

मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २१ धावांनी पराभव करत मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर लखनौच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला होता. लखनौ येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात विजय मिळवत भारताने मालिकेत १-१ ने बरोबरी केली होती. त्यामुळे आज (दि.१) लखनौच्या मैदानावर खेळवण्यात आलेला सामना निर्णायक असणार आहे. (IND vs NZ 3rdT20)

निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघ : शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग

न्यूझीलंडचा संघ : डेवॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर (कर्णधार), फिन अॅलन, मार्क चॅपमन, ग्लेन फिलीप, डेरिल मिचेल, मिचेल ब्रेसवेल, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्रेअर टीकनर,बेन लिस्टर

हेही वाचंलत का?

Back to top button