IND vs NZ 2nd T20 : भारताचा न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय; मालिकेत १-१ ने बरोबरी | पुढारी

IND vs NZ 2nd T20 : भारताचा न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय; मालिकेत १-१ ने बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने आता १-१ ने बरोबरी केली आहे. (IND vs NZ 2nd T20) भारताने न्यूझीलंडला ९९ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारतालाही या आव्हानाचा पाठलाग करताना चांगलीच कसरत करावी लागली. भारताने न्यूझीलंडचे १०० धावांचे आव्हान अंतिम षटकात म्हणजेच २० व्या षटकात गाठले. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादवची आव्हानाचा पाठलाग करताना चांगलीच दमछाक झाली. सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूमध्ये २६ धावा केल्या तर हार्दिक पंड्याने २० चेंडूमध्ये १५ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून इशान किशनने ३२ चेंडूमध्ये १९ धावा, राहुल त्रिपाठी १८ चेंडूमध्ये १३ धावा, शुभमन गिलने ९ चेंडूमध्ये ११ धावा केल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना एकवेळ न्यूझीलंडची अवस्था ५ बाद ६० धावा अशी झाली होती. मिचेल सँटनर आणि मार्क चॅपमनने अनुक्रमे १९ आणि १४ धावा केल्यामुळे न्यूझीलंडला ९९ धावा करता आल्या. न्यूझीलंडचे फलंदाज पाठोपाठ विकेट्स गमावत असताना सँटनरच्या खेळीमुळेच त्यांना ९९ धावांपर्यंत पोहचता आले. (IND vs NZ 2nd T20)

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांना चांगली सुरवात करता आली नाही. भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. सलामीवीर फिन अॅलन याचा त्रिफळा उडवत युजवेंद्र चहलने न्यूझीलंडला पहिला झटका दिला. यानंतर दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी १ विकेट पटकावत न्यूझीलंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. भारताचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही १ विकेट पटकावली तर अर्शदीप सिंगने २ बळी घेतले. (IND vs NZ 2nd T20)

हेही वाचंलत का?

Back to top button