Prithvi Shaw : पृथ्वी शॉने ‘व्हॅलेंटाइन डे’ला ‘या’ अभिनेत्रीशी गुपचूप केले लग्न?

Prithvi Shaw : पृथ्वी शॉने ‘व्हॅलेंटाइन डे’ला ‘या’ अभिनेत्रीशी गुपचूप केले लग्न?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) सीआयडी फेम अभिनेत्री निधी तापडियासोबतच्या (Nidhi Tapadia) नात्याचा मोठा खुलासा केला. यानंतर पृथ्वीने गुपचुप लग्न केल्याचा दावा माध्यमांमधून केला जात आहे. नुकतेच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून पृथ्वीने खळबळ उडवून दिली. स्टोरीच्या कॅप्शनमध्ये त्याने अभिनेत्री आणि मॉडेल निधी तापडियासोबतचा फोटो शेअर करत 'हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे माय वायफी' असे म्हटले. मात्र, काही क्षणातच पृथ्वीने इन्स्टाग्रामची ही स्टोरी हटवली. मात्र, तो पर्यंत सोशल मीडियावर त्याच्या आणि निधी तापडियाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली.

पृथ्वीच्या या इन्स्टा स्टोरीचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निधी तापडिया एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. याआधीही पृथ्वी आणि निधीचे पार्टी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. त्यानंतरही या जोडप्याने त्यांच्या नात्याबद्दल कधीही कोणतेही वक्तव्य केले नाही. पण आता शॉने पहिल्यांदाच उघडपणे निधीवरचे प्रेम व्यक्त केल्याची समोर आले आहे. निधीने प्रसिद्ध टीव्ही मालिका सीआयडीमध्ये काम केले आहे. तिने 2016 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

पृथ्वी शॉ अलीकडेच 18 महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग बनवण्यात आले. पण टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन तगडी असल्याने पृथ्वीला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये तो संघाचा भाग नाही. अशातच आयपीएल 2023 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत पृथ्वी आणि डेव्हिड वॉर्नर आघाडीवर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news