Australian Open 2023 : बेलारुसच्या अरिना सबलेन्काने पटकावला ग्रँडस्लॅम

Australian Open 2023 : बेलारुसच्या अरिना सबलेन्काने पटकावला ग्रँडस्लॅम

मेलबर्न; पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या महिला एकेरीत बेलारूसच्या अरिना सबलेन्काने बाजी मारत पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली. तिने कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिनाचा ४-६, ६-३ आणि ६-४ असा पराभव केला. रायबाकिनाने पहिला सेट ६-४ असा जिंकला, त्यानंतर सबलेन्काने जबरदस्त पुनरागमन करत दुसरा सेट ६-३ आणि तिसरा सेट ६-४ असा जिंकला. आता रविवारी पुरुष एकेरीचा अंतिम सामना सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ग्रीसचा स्टेफानोस सित्सिपास यांच्यात होणार आहे. (Australian Open 2023)

अरिना सबलेन्का आणि एलेना रायबाकिना या दोघींमधील हा चौथा सामना होता. सबलेन्का आजच्या विजयासह तिने चारही सामने जिंकले आहेत. ग्रँडस्लॅम फायनमध्ये दोघीजणी पहिल्यांदाच आमने – सामने आल्या होत्या. यापूर्वी, जुलै २०२१ मध्ये विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत रायबाकिना आणि सबालेन्का यांच्यात सामना झाला होता. याशिवाय, दोघींनी जानेवारी २०२१ मध्ये अबू धाबी टेनिस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत आणि सप्टेंबर २०१९ मध्ये वुहान ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आले होत्या. (Australian Open 2023)

२३ वर्षांच्या रायबाकिनाने आतापर्यंत तीन विजेतेपद पटकावले आहेत, त्यात एका ग्रँडस्लॅमचा समावेश आहे. रायबाकिनाने २०२२ मध्ये विम्बल्डनच्या रूपाने पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. महिला एकेरीत रायबाकिनाची सध्याची रँकिंग २३ आहे. त्याचबरोबर २४ वर्षीय सबलेन्काचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. मात्र, एकेरीत तिने ऑस्ट्रेलियन ओपनसह एकूण १२ विजेतेपदे जिंकली आहेत. सध्या ती पाचव्या रँकिंगवर आहे. (Australian Open 2023)

पाचव्या मानांकित सबालेन्का याआधी यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचली होती. अलीकडेच तिने अॅडलेड स्पर्धा जिंकली आहे. ती सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तिने या वर्षी रायबाकिनाविरुद्धच्या सामन्यापर्यंत एकही सेट सोडला नव्हता. अंतिम फेरीत तिने केवळ एक सेट गमावला आणि ती चॅम्पियन बनली.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news