Suryakumar and MS Dhoni T20 : सूर्यकुमार यादवची कमाल, रांचीमध्‍येच महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला | पुढारी

Suryakumar and MS Dhoni T20 : सूर्यकुमार यादवची कमाल, रांचीमध्‍येच महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेटच्‍या टी-२० फॉर्मेटमधील टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज सूर्यकुमार यादवने शुक्रवारी ( दि. २७) आपल्‍या नावावर नव्‍या विक्रमाची नोंद केली. त्‍याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्‍या होम ग्राउंड रांची येथे त्‍याचा नावावर असणारा विक्रम मोडित काढला. ( Suryakumar and MS Dhoni T20 ) जाणून घेवूया सूर्यकुमार यादवच्‍या नव्‍या विक्रमाविषयी…

भारत आणि न्‍यूझीलंड यांच्‍यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी रांची येथे झाला. या सामन्‍यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र या सामन्‍यात सूर्यकुमार यादव याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्‍या यादीत धोनीला मागे टाकले आहे.

सूर्यकुमार याने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्‍यात आतापर्यंत एकूण १६२५ धावा केल्‍या. धोनीने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९८ सामने खेळून १६१७ धावा केल्या होत्‍या. सूर्यकुमारने T20 आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये केवळ 46 सामने खेळून एकूण धोनींला मागे टाकले आहे.

Suryakumar and MS Dhoni T20 : सूर्यकुमार पाचव्‍या स्‍थानी

T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्‍या यादीत सूर्यकुमार हा आता पाचव्‍या स्‍थानी आला आहे. विराट कोहली  अग्रस्‍थानी असून रोहित शर्मा, केएल राहुल आणि शिखर धवन हे अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्‍या स्‍थानावर आहेत. सूर्यकुमारचा फॉर्म पाहता लवकरच तो शिखर धवनलाही पिछाडीवर टाकेल असे मानले जात आहे.

T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा कणारे फलंदाज  कंसात धावा
  • विराट कोहली ( 4008 )
  • रोहित ( 3853 )
  • केएल राहुल ( 2265 )
  • शिखर धवन ( १७५९ )
  • सूर्यकुमार यादव ( १६२५ )

हेही वाचा : 

 

 

Back to top button