KL Rahul-Athiya Wed:अथियावरून नजर हटेना; लग्नानंतर कार्यक्रमाचे फोटो समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल विवाह बंधनात अडकले. त्यांच्या लग्नातील फोटोज व्हायरल झाले. त्याचबरोबर हळद समारंभातील फोटोदेखील अथियाच्या इन्स्टाग्रामवर पहायला मिळाले. (KL Rahul-Athiya Wed) आता लग्नानंतर अथियाच्या पहिल्या फंक्शनमधील फोटो समोर आले आहेत. तिच्या लूकवरून नजर हटत नाहीये, इतकी सुंदर ती दिसतेय. तिचे फोटो तुम्ही खाली पाहू शकता. (KL Rahul-Athiya Wed)
अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल २३ जानेवारी, २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नसमारंभामध्येही मोजकी मंडळी, नातेवाईक उपस्थित होते. अथिया हळू-हळू इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नाचे फंक्शन्स फोटोज शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी अथियाने एक प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने आपल्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकून घेतली होती. फोटोमध्ये अथियाचा चेहरा दिसत नव्हता. पण, तिची स्माईल दिसत होती. अथियाजवळ तिचे वडील सुनील शेट्टीचा हात दिसत असून तिने आपल्या वडिलांचा हात धरलेला दिसत आहे.
या फोटोमध्ये अथिया शेट्टी हसताना दिसत आहे. तिची आई मना शेट्टी विधी पार पाडताना दिसत आहे. फोटोमध्ये सुंदर डोकोरेशन दिसत असून त्याची झलकही दिसत आहे. हे फोटोज खूप सुंदर असून काही फोटोंमध्ये अथिया आपल्या मैत्रीणींसोबत दिसतेय. वरून फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे.
- Nikki Tamboli : ब्लॅक ब्रालेटमध्ये निक्की तंबोलीने दिली किलर पोझ
- Shahrukh Jawan : आणखी एक धमाका करणार शाहरुख, ‘जवान’साठी कसली कंबर
- KL Rahul-Athiya : अथिया शेट्टी -केएल राहुलची ‘कुर्ता फाड’ हळदी (Photo Viral)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram