Australian Open | सानिया मिर्झाचा ग्रँडस्लॅम प्रवास थांबला! मुलासमोर खेळली ऑस्ट्रेलियन ओपन फायनल, अश्रू अनावर (Video)

मेलबर्न : पुढारी ऑनलाईन; ब्राझिलच्या राफेल माटोस (Rafael Matos) आणि लुईसा स्टेफनी (Luisa Stefani) यांनी ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे (Australian Open Mixed Doubles final) विजेतेपद पटकावले. तर भारताच्या सानिया मिर्झा ( Sania Mirza) आणि रोहन बोपण्णा यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्टेफनी-माटोस यांनी सानिया- बोपण्णा यांचा ७-६, ६-२ असा पराभव करत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. दरम्यान, या स्पर्धेसोबत भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा शानदार ग्रँडस्लॅम प्रवास संपला आहे. अंतिम सामना संपल्यानंतर सानियाने ब्राझीलच्या जोडीचे अभिनंदन केले. पण, तिच्या ग्रँडस्लॅम प्रवासाविषयी बोलायला सुरुवात केली तेव्हा सानियाला अश्रू अनावर झाले.
अंतिम सामन्यातील पराभवानंतर सानिया मिर्झा भावूक झाली. रॉड लेव्हर अरेना कोर्टवर आपल्या भावना व्यक्त करताना तिला अश्रू अनावर झाले. ”मी अजून काही स्पर्धा खेळणार आहे. पण माझ्या कारकिर्दीची सुरुवात मेलबर्नमध्ये २००५ मध्ये झाली होती. जेव्हा मी १८ वर्षांची असताना इथे खेळले. माझ्या ग्रँडस्लॅम कारकिर्दीचा अखेर करण्यासाठी मी यापेक्षा चांगल्या कोर्टचा विचार करू शकत नाही. रॉड लेव्हर अरेना माझ्यासाठी खूप खास आहे. मी माझ्या मुलासमोर ग्रँडस्लॅम फायनलमध्ये खेळू शकेन असे कधीच वाटले नव्हते.” असेही ती यावेळी म्हणाली.
सानियाच्या कारकिर्दीतील ही ११वी ग्रँडस्लॅम फायनल होती. तिने एकूण ४३ दुहेरीची विजेतेपदे जिंकली आहेत. त्यात सहा ग्रँडस्लॅमचा समावेश आहे. तिला महिला दुहेरीत ९१ आठवडे WTA रँकिंगमध्ये नंबर १ खेळाडू म्हणून स्थान मिळाले होते. ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ सोबत तिचा ग्रँडस्लॅम प्रवास संपवणार असल्याचे सानियाने आधीच जाहीर केले होते. तर ३६ वर्षीय सानियाने टेनिसमधून निवृत्ती घेण्यापूर्वी आणखी काही स्पर्धा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दुसरीकडे बोपण्णाने २०१७ च्या फ्रेंच ओपनमध्ये टाइमा बाबोस सोबत एक विजेतेपद पटकावले होते. तो यावेळी चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळला. (Australian Open)
“My professional career started in Melbourne… I couldn’t think of a better arena to finish my [Grand Slam] career at.”
We love you, Sania ❤️@MirzaSania • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/E0dNogh1d0
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2023
The FIRST all-🇧🇷 team to win a Grand Slam mixed doubles title!
Rafael Matos • @Luisa__Stefani • @wwos • @espn • @eurosport • @wowowtennis • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/Aw4UDtZsOP
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2023
हे ही वाचा :
- Australian Open | माटोस- स्टेफनी यांना ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद, सानिया मिर्झा- रोहन बोपण्णा यांचा पराभव
- सानिया मिर्झाचा पराभव, महिला दुहेरीतील ग्रँडस्लॅम कारकीर्द संपुष्टात